Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Sugar Quota System: साखरेच्या कोटा पद्धतीत केंद्राचा मोठा बदल; महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर काय होणार परिणाम?

Sugar Quota Policy: साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्यास कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन त्याचा अप्रत्यक्ष परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकांवर होऊ शकतो. मात्र, ग्राहकांच्या दृष्टीने बाजारात साखरेची उपलब्धता वाढल्याने किरकोळ दरात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 04:25 PM
Sugar Quota Policy, Maharashtra Sugar Industry,

Sugar Quota Policy, Maharashtra Sugar Industry,

Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबर २०२६ पासून साखरेची विक्री मासिक ऐवजी पंधरवड्याच्या कोट्यानुसार होणार
  • केंद्राच्या नव्या धोरणाचा महाराष्ट्रातील प्रमुख साखर कारखान्यांवर थेट परिणाम
  • बाजारात साखरेची आवक वाढल्याने घाऊक दर कमी होण्याची शक्यता
New Sugar Quota System: देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर २०२६ पासून साखर विक्रीच्या कोटा पद्धतीत बदल केला आहे. आता कारखान्यांना मासिक कोट्याऐवजी पंधरवड्यानुसार साखर बाजारात आणावी लागणार आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रातील साखर उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हा देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य असल्याने नव्या कोटा पद्धतीचा परिणाम येथील कारखान्यांना जाणवणार आहे.

नियमित विक्री करावी लागल्याने कारखान्यांच्या साठ्यावर आणि रोख प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. बाजारात पुरवठा वाढल्यास साखरेचे दर आणखी नरमण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्यास कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन त्याचा अप्रत्यक्ष परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकांवर होऊ शकतो. मात्र, ग्राहकांच्या दृष्टीने बाजारात साखरेची उपलब्धता वाढल्याने किरकोळ दरात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंधरवड्याचा कोटा लागू झाल्यास साखरेची विक्री आणि उपलब्धतेवर केंद्राचे लक्ष राहणार आहे. सणासुदीच्या काळात पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Raigad News: रायगड लोकसभेवर शिंदे गटाचा दावा? भरत गोगावलेंच्या ‘झाकली मूठ’ वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

सप्टेंबरमध्ये दर किती राहणार ?

पंधरवड्याच्या कोट्यामुळे साखरेचा पुरवठा नियमित झाला आणि बाजारातील मागणी स्थिर राहिली, तर अहिल्यानगर जिल्ह्यात कारखाना/घाऊक पातळीवरील साखरेचे दर साधारण ४८ ते ५५ रुपये प्रति किलो राहण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात वाहतूक, व्यापारी मार्जिन, साखरेचा प्रकार आणि बँडनुसार दर साधारण ५५ ते ६५ रुपये प्रति किलो राहू शकतो.

पंधरवड्याच्या कोटा पद्धतीमुळे साखरेचा

पुरवठा नियमित राहण्यास मदत होईल. कारखान्यांनी शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार साखरेची विक्री करणे अपेक्षित आहे. बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात साखर येऊन दरावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी नियोजन आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास पुरवठा सुरळीत ठेवण्यास या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
डॉ. केदारी जाधव, साखर संचालक (प्रशासन)

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये

 

Web Title: Center changes sugar sale quota system from september 2026 impact on maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Sugar

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार
1

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ
2

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

साखरेचा दर १०० रुपये किलोवर जाणार? महागाईचा फटका की शेतकऱ्यांना मोठा फायदा
3

साखरेचा दर १०० रुपये किलोवर जाणार? महागाईचा फटका की शेतकऱ्यांना मोठा फायदा

Sugar Mill Setup Cost: साखर कारखाना सुरू करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या साखर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया!
4

Sugar Mill Setup Cost: साखर कारखाना सुरू करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या साखर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.