उद्योगमंत्री उदय सामंत (फोटो- सोशल मिडिया)
कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री डॉ उदय सामंत म्हणाले, ‘रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षाच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू.’
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या परिषदेला उद्योग विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मिनाक्षी कुंभार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर, एमआयडीसी फेडरेशनचे प्रशांत पटवर्धन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक राजेश सायत, राज आबे यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1. एक्सप्रेस ग्रुपची १०० कोटीची गुतवणूक विमानतळापासून २ किमी, शहरापासून ३ किमी आणि समुद्रापासून अवघ्या १ किमी अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे.
2. जयगड येथे महिंद्राचे फाईव्ह स्टार हॉटेल जयगड येथे उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा याच्या पंचतारांकित हॉटेलवे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
3. विमानसेवा लवकरच सुरू रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवावापर्यंत ‘गटीआर (ATR) प्रवासी विमान उक्षण घेईल.
पारदर्शक सेवा उद्योगासाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ अॅप सुरू करण्यात आले असून सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढच्या सोमवारी घरबसल्या बेट ऑफर लेटर मिळेल. तसेच ‘मैत्री पोर्टलवर अर्ज केल्यास ३० दिवसात दाखला मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जाऊन पुढील ८ दिवसांत मंजुरी दिली जाते.






