Chhagan Bhujbal on pune tour told about women empowerment,
कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानतर्फे कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित जिल्हा आणि तालुकास्तरीय निमंत्रित मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले की, “मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळाल्यास त्या त्यांची चुणूक दाखवून देतात. लहान वयातच मुला-मुलींवर खेळांचे संस्कार झाल्यास ते ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यापर्यंत मजल मारू शकतात. शहरांसोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा कौशल्य ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन देणे आवश्यक आहे” असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.