Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात; घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण

नगराध्यक्ष पदासाठी सर्वात जास्त उमेदवार सिल्लोडमध्ये असल्याने आमदार अब्दूल सत्तार यांना विरोधकांचे राजकीय 'डाव' उधळून लावण्याची रणनिती आखावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 18, 2025 | 05:18 PM
Chhatrapti Sambhajinagar News

Chhatrapti Sambhajinagar News

Follow Us
Close
Follow Us:
  • सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात
  • राजकीय ‘घोडेबाजार’ चर्चेत
  • १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण १३१२ इच्छुकांचे अर्ज दाखल
Chhatrapati Sambhajinagar News: राजकीय वाटचालीची पहिली पायरी अन् तालुक्यातील राजकारणाचा धुराळा महायुती अन् महाआघाडीच्या निर्णयानंतर उडणार असल्याचे दिसते. उमेदवारी दाखल करण्यास सहा दिवस मिळालेले असताना ‘वेट अँड वॉच’ च्या नादात पहिले चार दिवस कुणीच उमेदवारी दाखल केली नाही. युती, आघाडीबाबत वरुन आणि स्थानिक पातळीवर निर्णय होत नसल्याचे दिसताच शेवटच्या दोन दिवसात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपणदेखील ‘रेस’ मध्ये असल्याचे दाखवून शक्ती दाखवण्याचे काम केलेले आहे.

२१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी परत घेण्याच्या दिवसापर्यंत राजकीय ‘घोडेबाजार’ चर्चेत येणार आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिका अन् एक नगरपंचायत वर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आदेश युतीच्या नेत्यांनी दिले आहे तर दुसरीकडे राज्यात बदलेल्या सत्तासमीकरणात आमदारांना स्वतःचे अस्तित्व अजूनही जिवंत असल्याचे दाखवणारी ‘परीक्षा’ असल्याची चचर्चा रंगली आहे.

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

नगराध्यक्ष पदासाठी सर्वात जास्त उमेदवार सिल्लोडमध्ये असल्याने आमदार अब्दूल सत्तार यांना विरोधकांचे राजकीय ‘डाव’ उधळून लावण्याची रणनिती आखावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण १३१२ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. निवडणुका विविध कारणांनी अनेक वर्ष लांबल्या होत्या.

पैठण, सिल्लोडवर लक्ष…

न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजताच तालुक्यातील वॉर्डस्तरीय नेते सक्रिय झाले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी लोकल पातळीवरील नेत्यांवर उमेदवार निवडीची जबाबदारी सोपवल्याने ‘जागा एक आणि उमेदवार अधिक’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी हे महायुतीत एकत्र असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तोच फॉर्म्युला लागू होईल, असे मानून अनेक इच्छुकांनी थोडे मागे घेतले होते. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही महायुतीकडून स्पष्ट संकेत न मिळाल्याने स्थानिक आमदारांनी ‘मैत्रीपूर्ण निवडणूक’ लढवण्याचे जाहीर करत इच्छुकांना थेट अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले.

यामुळे जिल्ह्यातील सहा इच्छुक नगराध्यक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. परिणामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिल्लोड नगरपालिकेत आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र आहे. तर पैठणची नगरपालिका परंपरेनेच राजकीय रणनीती आणि अंतर्गत खेळींसाठी चर्चेत राहणारी असल्याने या वेळीही स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

१३१२ इच्छुकांचे अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण १३१२ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी ८८ तर सदस्यपदासाठी १३१२ अर्जाचा समावेश आहे. यात पैठणमध्ये सर्वाधिक ३०४ अर्ज आले आहेत. अध्यक्षपदासाठी सर्वाधिक १० अर्ज सिल्लोडमधून तर सदस्यपदासाठी सर्वाधिक २९० अर्ज पैठणमधून दाखल झाले आहेत. आता २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, २१ रोजी लढत्तीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

१७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
१८ नोव्हेंबर अजांची छाननी
२१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत
२६ नोव्हेंबर चिन्ह वाटप
२ डिसेंबर मतदान
३ डिसेबर मतमोजणी

Web Title: Chhatrapati sambhajinagar nagarpalika election sillod local body election horse marketing maharashtra poltiics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर
1

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
2

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले
3

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.