Chitra Wagh and Prasad lad bhaubeej celebration in diwali 2025 political news
Chitra Wagh Prasad lad bhaubeej: मुंबई : दिवाळी सणातील आज भाऊबीजचा दिवस आहे. यानिमित्ताने बहीण भावाला ओवाळतात. राजकीय वर्तुळामध्ये देखील मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. राजकारणामध्ये भावा-बहीणीच्या अनेक जोड्या लोकप्रिय आहेत. यामधील एक आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची जोडी आहे. दरवर्षी चित्रा वाघ या प्रसाद लाड यांचे भाऊबीजेच्या निमित्ताने औक्षण करतात. यावेळी देखील दोन्ही नेत्यांनी अगदी आनंदाने दिवाळी साजरी केली. भावाला म्हणजे प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर मीडियाशी बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर भाऊबीजेच्या निमित्ताने राजकीय भाष्य केलं.
आमदार चित्रा वाघ यांनी त्यांची भाऊबीज साजरी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की,“आमच्या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये. आनंदाचा क्षण आहे. ही नाती बळ देतात. पवित्र नातं आहे. आमचे नाते रक्ताच्या पलीकडचे आहे. आम्हाला आनंद आहे. आज माझा परिवार त्याला घ्यायला खाली गेला. माझ्या सोबत हा असतो. आमच्या नात्यात कधी खंड पडला नाही. दिखावेपणाचं नाटक केलं नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
काही नाती रक्ताची नसतात,
पण त्या नात्यांची वीण रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असते…
ती घडते सत्कर्मातून, विचारातून आणि सेवाभावातून.
माझं आणि प्रसाद दादाचं नातं असंच —
जनसेवेच्या धाग्याने विणलेलं 💫 हे नातं असंच वुद्धीगंत, दृढ आणि प्रेरणादायी व्हावं,
हीच श्री स्वामी समर्थांच्या… pic.twitter.com/vQTw3V0X7H — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे आण राज ठाकरे यांच्यामधील दुरावा कमी झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले असून त्यांच्यामध्ये राजकीय युती होण्याची देखील शक्यता आहे. यावरुन भाऊबीजेच्या दिवशी चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना धारेवर धरले. चित्रा वाघ म्हणाल्या की, “आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत. आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरुन देवाभाऊंना आशिर्वादच देत असतील. तुमच्यामुळे, लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना, पण आज हे दोघे एकत्र आलेले आहेत. मला तर सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी आहे. खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत, ज्या बहिणी इतकी वर्ष भावाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी वंचित होत्या. या आज त्या ठिकाणी आहेत” असा टोला चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रसाद लाड यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘माझ्यासाठी ही आनंदाची दिवाळी आहे. ताईची आमदार म्हणून पहिली दिवाळी आहे’ मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल. आम्हाला आव्हानच नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच शिवसेना. मागची एक निवडणूक छोटी होती. बेस्ट निवडणुकीत मी एकटा लढलो. मुंबईची जनता सुशिक्षित जनता आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही केले.यावेळी 31 हजाराचा बोनस मिळाला आहे. ठाकरे ब्रँडचं आव्हान नाही. आम्ही निवडणूक लढवत असताना भाजपा नाही, श्रमिक म्हणून लढलो. मला वाटते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली, त्याला मदत देवाभाऊ यांनी केली” असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.