Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Maharashtra Drought News: मुख्यमंत्री धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 23, 2026 | 08:43 AM
Maharashtra Drought News,

Maharashtra Drought News,

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मैदानात
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर, धाराशिव (एरमाळा, तुळजापूर) आणि सोलापूर दौरा
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा दौरा
Maharashtra Drought News : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस आज धाराशिव, लातूर,सोलापूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार आहेत. लातूरमधील दोन ठिकाणी तर धाराशिव येथील एरमाळा आणि तुळजापूर भागातील पाहणी करणार आहेत. यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातही ते पाहणी करणार असल्याची माहिती आहे. (CM Devendra Fadnavis And Dy CM Eknath Shinde Visit Drought Affected Regions In Maharashtra)

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

शनिवारी निघणार दुष्काळाची अधिसूचना

आतापर्यंत ज्या ठिकाणांच्या दुष्काळाची माहिती मिळाली आहे, त्याठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. तसेच अधिसुचना काढण्याचे कामही सुरू झाले आहे. जसजशी माहिती येत राहिल त्यानुसार त्या भागांचाही समावेश केला जाईल, येत्या शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भाची अधिसूचना काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. याशिवाय गरज पडल्यास केंद्र सरकारकडेही आर्थिक मदत मागितली जाऊ शकते, पण केंद्र सरकारच्या मदतीसाठी थांबणार नाही, राज्य सरकारचे मदतकार्य सुरू राहिल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे विदर्भ

दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज (23 सप्टेंबर) विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सर्व मंत्र्यांनाही आपापल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे आणि पाहणी करण्याचे, गावागावात जनता दरबार घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेचा प्रत्येक मंत्री ग्राऊंड झिरोवर उतरला पाहिजे, उद्यापासून कामाला लागा, अशा स्पष्ट सुचनाही शिंदेंनी दिल्या आहेत.

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

सुनेत्रा पवारांचा दुष्काळी भागांचा आढावा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यंनी अमरावतीतील वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी भागांचा आढावा घेतला. मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि नागरिकांच्या समस्यांसह पाणी टंचाईच्या समस्यांची माहिती दिली. यानंतर सुनेत्रा पवारांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला.

 

Web Title: Cm devendra fadnavis dy cm eknath shinde drought inspection tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • drought news
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी
1

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
2

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.
3

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
4

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.