Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis यांची बुलेटवरून विधानभवन परिसरात दमदार एंट्री, सुरक्षारक्षकांचासुद्धा सोबत बाईकने प्रवास

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री केली. आपल्या ताफ्यासोबत न येता यावेळी ते बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्तित होते.

  • By विवेक
Updated On: May 14, 2026 | 05:50 PM
Devendra Fadnavis riding bullet

Devendra Fadnavis riding bullet

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री
  • अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन
  • मोदींच्या वाहनातील संख्याही निम्म्याने कमी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन देशवासियांना केले होते. यानंतर देशभरातून अनेक चर्चाना उधाण आले. विशेषकरून विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. सामान्य नागरिकांनी देखील मंत्र्यांच्या ताफ्यावरून होणाऱ्या इंधनाच्या वापरावरून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. अश्यातच प्रधानमंत्री मोदी यांच्यासह अनेक बड्या मंत्र्यांनी आपल्या ताफयातील वाहनांवर कपात केली. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री केली. आपल्या ताफ्यासोबत न येता यावेळी ते बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्तित होते.

पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधत आपल्या वाहनांचा ताफा कमी करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ते इलेक्ट्रिक वाहनांमधूनच प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री नितेश राणे, भाजप नेते प्रवीण दरेकर हेदेखील इलेक्ट्रिक वाहन वापरणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

मोदींच्या वाहनातील संख्याही निम्म्याने कमी

पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनानंतर त्यांनी स्वतः इंधन बचतीसाठी प्रयत्न केले आहेत. आपल्या वाहनांतील निम्म्या वाहनांमध्ये त्यांनी कपात करण्याचे आदेश एसपीजीला दिले आहेत. पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार एसपीजीकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह बुलेटवरून डबलसीट विधानभवन परिसरात दाखल

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्यासह बुलेटवरून डबलसीट विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांचे सुरक्षारक्षकसुद्धा त्यांच्यासोबत बाईकने प्रवास करत होते. इंधन बचतीवरून प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावरून मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्रीसुद्धा वाहनांचा कमी वापर करून पायंडा पाडत असल्याचे दिसून येत आहे.

नीलम गोर्हे, बच्चू कडू यांच्यासह १० जणांची विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ सर्वात आधीं नीलम गोर्हे आणि बच्चू कडू यांनी घेतली. त्यानंतर अंबादास दानवे, प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनीदेखील विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सर्व सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

Web Title: Cm devendra fadnavis enters maharashtra asembly area on bike with ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • CM Devendra Fadnavis
  • narendra modi
  • Vidhansabha

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.