Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phaltan Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सभागृहात चर्चा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सभागृहात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि कारवाई सांगितली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 09, 2025 | 12:34 PM
CM Devendra Fadnavis information in the legislature on the Phaltan doctor suicide case

CM Devendra Fadnavis information in the legislature on the Phaltan doctor suicide case

Follow Us
Close
Follow Us:
  • फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर सभागृहात चर्चा
  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम
  • तिची फसवणूक करुन तिचं शारीरिक शोषण केल्याची कबुली
Phaltan doctor suicide case : नागपूर : राज्याच्या विधीमंडळाचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आठ दिवसांच्या या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे जोरदार टीकेचे वादळ उटल्यानंतर आता विरोधकांनी सभागृहामध्ये महायुतीला सरकारला घेरले. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सभागृहात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि कारवाई सांगितली.

फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावर सभागृहामध्ये चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात दु:खाची लाट तयार झाली. आपण एसआयटी नेमली आहे. न्यायिक समितीमार्फत चौकशी सुरु आहे. तीन मुद्दे सन्मानीय सदस्यांनी उपस्थित केले. आतापर्यंतच्या तपासात फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे, ती हँडरायटिंग तिचीच आहे” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली. “दुसरा विषय मांडला की, या प्रकरणात आरोपी आहेत, त्या आरोपींनी दबाव आणला का? मूळामध्ये या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत, या बदनेने एकप्रकारे जी काही माहिती आली, चॅट आलेले आहेत, त्या सगळ्यामध्ये बदनेने तिची फसवणूक करुन तिचं शारीरिक शोषण केलं” अशी कबुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे देखील वाचा : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

पुढे ते म्हणाले की, “बदनेने हे सर्व केल्याचं तपासातून निष्पन्न होत आहे. त्यातून मग लग्नाचं आमिष दाखवणं अशा गोष्टी आलेल्या आहेत. नंतर मात्र वेगळी भूमिका बदनेने घेतलेली दिसते. तिच शोषण केल्याचं लक्षात येतं. ती मेडीकल ऑफिसर होती, ज्या आरोपाीला अटक होते तो अटकेकरता फिट आहे का? याबाबत रिपोर्ट घ्यावा लागतो. अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या महिला डॉक्टरने अनफिट म्हणून दिले. म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांना लिहिलेलं. महत्वाच्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना अनफिटचं प्रमाणपत्र दिलं जातंय. मग त्यावर चौकशी झाली. तिने सुद्धा पत्र दिलं. हे सगळं पाचमहिने आधीच आहे”असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं आहे.

हे देखील वाचा : मी माझ्या पगारावर समाधानी…! सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमप्लेट व्हायरल

“आत्महत्या प्रकरणामध्ये मात्र बदनेने केलेली फसवणूक आहे. त्या परिस्थितीचा फायदा उचलून दुसऱ्या आरोपीने तिची फसवणूक केली. त्या दोघांची नावं लिहून तिने आत्महत्या केली. आतापर्यंतचे जे रिपोर्ट्स आहेत, फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत, त्यानुसार गळफास लावून झालेला मृत्यू आहे. हातावर लिहिलेलं अक्षर त्या महिलेचं आहे. तपासातून समोर आलय. तपास अजून संपलेला नाही. आरोपपत्र दाखल होईल. अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. पोलीस तपास हा महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालला आहे” अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिली आहे.

Web Title: Cm devendra fadnavis information in the legislature on the phaltan doctor suicide case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • political news

संबंधित बातम्या

बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता; सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या
1

बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता; सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील गटाला धक्का; भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश
2

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील गटाला धक्का; भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश

Maharashtra Politics : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ
3

Maharashtra Politics : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Farmers News: “३० जूनपूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी: मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही”
4

Farmers News: “३० जूनपूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी: मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.