नागपूरमधील विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांची नेम प्लेट व्हायरल झाली (फोटो - सोशल मीडिया)
Additional Commissioner Rajesh Khawle : नागपूर : सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण तर महाराष्ट्रात प्रचलित आहे. सरकारी कामं कोणतंही करायचं असल्यास चिरमिरी दिल्याशिवाय पूर्णच केले जात नाही. टेबलावर येणारी प्रत्येक फाईल ही टेबलाखालून कशी जाईल याचाच विचार सरकारी अधिकाऱ्यांकडून केला जातो. यासाठी चिरमिरी घेतली जाते आणि अनेकदा अधिकारी हे रंगेहात देखील सापडतात. पण नागपूरमधील एका अधिकाऱ्याने हा सर्व प्रकार एकाच वाक्यात संपवला आहे. नागपूरमधील (Nagpur News) विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांची नेम प्लेट सध्या चर्चेत आली आहे.
नागपूर विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त सध्या चर्चेत आले आहेत. महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी खास नावाची पाटाची लावली. यामध्ये त्यांनी आपल्या प्रामणिकपणाचा थेट पुरावा दिला आहे. महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांच्या दालनात प्रवेश करताच टेबलवरील नेम प्लेट लक्षवेधी ठरत आहे. यावर ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे.’ अशी ओळ सर्वांचे लक्ष वेधून घेते. या नेमप्लेटची सध्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. खवले यांनी आमिष देणाऱ्यांना काही बोलण्यापूर्वी सावधगिरीचा इशारा या नेम प्लेटवरून दिला आहे.
हे देखील वाचा : ‘श्रमिकांचं आभाळ फाटलं’; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन
कायद्याच्या आणि नियमांच्या चौकशीमध्ये फाईल अडकू नये म्हणून अधिकाऱ्यांना मिठाई दिली जाते. या मिठाईमध्ये काय असते हे आता प्रत्येकाला माहित झाले आहे. यासाठी अनेकदा सांकेतिक भाषा वापरली जाते. अधिकारी अडकू नये म्हणून पैसे घेताना चातुर्य वापरले जाते. पण अशा लोकांना राजेश खवले यांनी त्यांच्या नेमप्लेटवरून सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याची नागपूरमधील महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुका MVA एकत्रित लढणार? ‘या’ नेत्याचे कार्यकर्त्यांना निर्देश
दरम्यान या नेमप्लेटवरून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अधिकारी, जनतेला सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांची पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांनी कार्यालयाबाहेर मी माझ्या पगारावर समाधानी आहे, असा फलक लावत आपल्या कार्यालयात भ्रष्टाचाराला अजिबात थारा नसल्याचे ठणकावले होते. तसेच मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही. तर मला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर निवेदने, तक्रारी लेखी स्वरूपात पाठवाव्यात. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर सोशल मीडियावर नाव व गावासह तक्रारी द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांनी व्हॉट्सॲप क्रमांकही दिला होता. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात त्यांची चर्चा रंगली होती. यानंतर आता नागपूरचे महसूल अधिकारी चर्चेत आले आहेत.






