छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा (फोटो- सोशल मीडिया)
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवादी ठार
सुकमा जिल्ह्यात झाली मोठी चकमक
अद्याप सर्च ऑपरेशन जारी
सुकमा: गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा यंत्रणेने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणेला मोठे यश आले आहे. या भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 12 नक्षलवादी ठार झाले असल्याचे समोर आले आहे.
Chhattisgarh | 12 naxals killed in an encounter that broke out between DRG and Naxals in the forest under Kistaram area of Sukma district. Automatic weapons were also recovered: SP Sukma Kiran Chavan https://t.co/OPELbFoF0c — ANI (@ANI) January 3, 2026
सुकमा जिल्हयापाठोपाठ बिजापूर जिल्ह्यात देखील दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमा आणि बाजूच्या परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. छत्तीसगडमधील बस्तर परिसरात चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाले आहेत.
नक्षलवाद संपणार! CPI टॉप कमांडर गणेशला कंठस्नान; ‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश
तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांचे एक पथक नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निघाले होते. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. या परिसरात मोठी चकमक झाली. त्यात आतापर्यंत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत.
‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश
६९ वर्षीय कमांडर गानेश्वर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत गणेशसह चार नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. ओडीशा पोलिसांचे नक्षलवादी ऑपरेशनचे डीआयजी यांनी या ऑपरेशनबद्दल माहिती दिली.
ओडीशा स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सीआरपीएफ, बीएसएफच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली आहे. कंधमाल आणि गंजम जिल्ह्यातील झालेल्या कारवाईत गणेशला कंठस्नान घालण्यात आले. त्याच्यावर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये तीन नक्षलवादी ठार झाले. ज्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
अंत होने वाला है! ‘या’ राज्यात तब्बल 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; प्रत्येकावर होते 1 लाखांचे बक्षीस
ओडीशा राज्यातील अनेक जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. या भागात अजून काही नक्षलवादी लपले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांची संयुक्त पथके या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबबत आहेत.
केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद नष्ट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एकतर शरण यावे किंवा सुरक्षा यंत्रणेची गोळी खावी असे दोनच पर्याय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत. दरम्यान ओडीशा राज्यात एकाच वेळी तब्बल 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.






