Comedian Kunal Kamra also criticizing Congress leader Rahul Gandhi leadership video viral
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याच्या कवितेवरुन राजकारण तापले आहे. एका शोमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता केली होती. यामध्ये त्याने शिंदेंच्या बंडखोरीचा संदर्भ देत खोचक टोला लगावला होता. यावरुन मात्र शिंदे गट जोरदार आक्रमक झाला. शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय टीका करणारी कविता सादर केल्यामुळे कुणाल कामरा हा चर्चेत आला आहे. त्याने बंडखोरी आणि राजकारण अशा मुद्द्यांवरुन कविता सादर केली होती. यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. यामुळे ठाकरे गटाने देखील कुणाल कामरा याची बाजू सावरुन घेत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदेंवरील टीकेनंतर ठाकरे गटाने कामराला पाठिंबा देत ही फक्त राजकीय टीका असल्याचे खासदार राऊत म्हणाले आहेत.
कुणास कामरा संबंंधित आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणानंतर सध्या कुणाल कामरा हा कॉमेडियन चर्चेत आला आहे. त्याच्या आता एकनाथ शिंदेंवरील टीकेची व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुणाल कामरा याच्या या जुन्या व्हिडिओमध्ये तो कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वावर देखील संशय व्यक्त करत आहे. त्यामुळे फक्त एकनाथ शिंदे नाही तर राहुल गांधी यांच्यावर देखील कुणाल कामरा याने टीका केली असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कुणाल कामरा याचा व्हिडिओ मुलाखत स्वरुपातील आहे. यामध्ये कुणाल म्हणत आहे की, “समस्या अशी आहे की आपण राहुल गांधींना एक नेता म्हणून गांभीर्याने घेत नाही. प्रत्येकवेळा सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की आपण त्यांना निवडून देणार नाही. याचे कारण हे देखील स्पष्ट आहे. लोक काँग्रेसला मतदान करत नाहीत कारण त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी आहेत, ज्यांना अजिबात गांभीर्याने घेतले जाऊ शकत नाही,” अशी टीका कुणाल कामरा याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नंतर हा व्हिडिओ त्याने डिलीट देखील केला.
Kunal kamra sharing his views about Rahul Gandhi 🤡 https://t.co/lQSjZKcXSS pic.twitter.com/MDAfHBBCsR
— Chota Don (@choga_don) March 24, 2023
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा यांची बाजू सावरली असून महायुतीवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, “राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा तो ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते का फोडले नाही? प्रशांत कोरटकर याने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोहचण्याची भाषा केली, तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाही? एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या. आता एखादा कलाकार अत्यंत उपाहसाने सत्य परिस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत? व्ही सपोर्ट कुणाल कामरा” असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.