Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली महायुतीची पोलखोल? म्हणाले, “आता मांडवली…”

रेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली असून चार तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे टीकेची झोड उठत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2025 | 11:02 AM
congress president harshvardhan sapkal target suresh dhas dhananjay munde meet

congress president harshvardhan sapkal target suresh dhas dhananjay munde meet

Follow Us
Close
Follow Us:

बीड : मागील दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण बीडभोवती फिरते आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे अनेक राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. यामध्ये महायुतीच्या भाजपचे नेते व आमदार सुरेश धस यांनी देखील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आवाज उठवला होता. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली असून चार तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे टीकेची झोड उठत आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचारसह अनेक गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरावे दिल्याचा दावा देखील सुरेश धस यांनी दिला होता. मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे टीकेची झोड उठवली गेली. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला. तर समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस हे न्यायासाठी लढतच नव्हते, असे म्हणत टीका केली आहे. यावर आता कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

सुरेश यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावरुन टीका करताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “पहिले आगा आगा आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडल्या जात होती. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली मांडवली, या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे.”, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीबाबत गौप्यस्फोट देखील केला आहे. सुरेश धस यांनी आका आका म्हणत बीडच्या राजकारणामध्ये रान पेटवले होते. मात्र नंतर भेट घेतल्यामुळे तेच संशयाच्या फेऱ्यामध्ये आले आहेत. याबाबत सपकाळ म्हणाले की, “टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिलेली सूचना होती.” असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला. महायुतीत भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला सपकाळ यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या भेट झाल्याचे समोर येताच टीकेची झोड उठवण्यात आली. यामुळे सुरेश धस यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणली होती. ही बैठक चार तास चालल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्या व्यक्तीने आपल्या बदनामीचा प्रयत्न केला. त्याचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे सुरेश धस म्हणाले आहे.

Web Title: Congress president harshvardhan sapkal target suresh dhas dhananjay munde meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • Congress
  • Dhnanjay Munde
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.