
Congress Prithviraj Chavan controversial statement on Operation Sindoor and Indian Army
ऑपरेशन सिंदूरवर टीका करत अनेकांनी अप्रत्यक्षपणे भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हणाले की, “अलीकडेच, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे सरकले नाही. दोन-तीन दिवसांत जे काही घडले ते हवाई युद्ध आणि क्षेपणास्त्र युद्ध होते. भविष्यातही अशाच पद्धतीने युद्धे लढली जातील. अशा परिस्थितीत, आपल्याला खरोखरच १२ लाख सैनिकांची सेना असण्याची गरज आहे का, की आपण त्यांना दुसरे काही काम करायला लावू शकतो?”असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : राजकीय नेत्यांना मुली पुरवणारे एपस्टीन कांड; तीन नेत्यांचा समावेश, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
पुढे ते म्हणाले की, “सैन्याच्या बाबतीत, आपल्याकडे १.२ दशलक्ष ते १.५ दशलक्ष सैनिक आहेत, तर पाकिस्तानकडे ५,००,००० ते ६,००,००० सैनिक आहेत. पण ही एवढी मोठी संख्येच्या सैन्याचे आपण करणार काय? आता तुमच्याकडे किती जमीनवर लढणारे सैन्य आहे याने काहीही फरक पडत नाही,” असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान
पुढे ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आमचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आपण गमावली. लोकांनी हे मान्य करो अथवा न करो, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर ठेवण्यात आले होते आणि एकही विमान उडाले नाही. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते तर पाकिस्तानने ते पाडण्याची शक्यता जास्त होती. यामुळे, हवाई दल पूर्णपणे जमिनीवर ठेवण्यात आले होते.” असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे.