Prithviraj Chavan PC: एपस्टीन फाईलमध्ये देशातील आजी माजी तीन खासदार; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा
पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तापालात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “अमेरिकेच्या सिनेटने या प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे (हनी ट्रॅप) असे गुन्हे आहेत. यामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यात भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश असून, ही कागदपत्रे खुली झाल्यावर त्याचे गंभीर पडसाद देशातील राजकारणात उमटून पंतप्रधानपदी बदल होऊ शकतो.” (Prithviraj chavan)
जेफ्री एपस्टिन याला अटक केल्यानंतरही हाय सेक्युरिटीममध्ये ठेवण्यात आलं, कारण ट्रम्प आणि त्याचा खूप जवळचा संबंध असल्याची चर्चा होती. ट्रम्प हे त्या बाबतीत कोणतेही पुरावे समोर येऊ देणार नाही. हे उघडकीस आल्यामुळे गेल्या ५-७ वर्षांपासून तिथे खूप मोठा गदारोळ सुरू आहे. त्याने काय केलं, कोणाकोणावर अत्याचार केले. शोषण केलं हे सर्व उघडकीस आले पाहिजेअशी मागणी जोर धरत आहे. अनेक लहान मुलींनी एपस्टिनवर गंभीर आरोप केले आहे. हा विषय़ फार संवेदनशील असल्याने त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. पण ऑगस्ट २०२९ मध्ये त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. व्हिडीओ तपासला असता त्यात नेमका २ मि. कॅमेरा बंद होता. त्यामुळे अनेकांनी त्याचा खून झाल्याचा दावा केला. यात हिलरी क्लिंटनच्या सेक्रेटरीचे नाव घेतले गेल्याचा दावा केला गेला. पण त्याने जे व्हिडीओ चित्रीकरण केलं होते. ते अमेरिकेच्या कायदेमंत्र्याकडे गेले. हे सर्व कागद त्यांच्याकडे आहे. या जेफ्रीची जी ग्राहकांची लिस्ट आहे म्हणजेच त्याने यात कोणाकोणाला गुंतवलं याची सर्व माहिती त्या कायदे मंत्र्याकडे आहे. पुढ ट्रम्प यांनी यात हस्तक्षेप करत या प्रकरणातील कोणतीही कागदपत्रे सार्वजनिक न कऱण्याचे आदेश दिले होते.
पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एपस्टीन प्रकरण उघड न झाल्यास किंवा दोषींना शिक्षा न झाल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, अशी भीती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील खासदारांना आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्रम्प यांच्यावर दबाव टाकत संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली.
या मागणीनंतर 19 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एक कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार एका महिन्याच्या आत ‘एपस्टीन फाईल्स’ खुल्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.






