Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress vs Parth Pawar : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर

Maharashtra Politics : बारामतीमध्ये उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून प्रत्युत्तर देत पार्थ पवारांना धारेवर धरलं आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2026 | 11:17 AM
Congress social media post target parth pawar over baramati by election 2026

Congress social media post target parth pawar over baramati by election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेस पक्षाची पार्थ पवारांवर टीका
  • धड भाषणही देता न येणाऱ्या म्हणत हिणवलं
  • बारामती पोटनिवडणुकीवरुन काँग्रेस आणि पार्थ पवारांमध्ये वादंग
Congress on Parth Pawar : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati by election) जाहीर झाली. अजित पवारांनंतर बारामतीची धुरा कोण हाती घेणार यावरुन चर्चांना उधाण आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला असून ही निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रयत्न करण्यात आला. विनंती करुन देखील काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसवर टीका करणाऱ्या पार्थ पवारांना (Parth Pawar) काँग्रेस पक्षाने खडेबोल सुनावले आहेत.

बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. घरातील व्यक्ती वारल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. बारामतीच्या रिंगणात उमेदवार न देण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पार्थ पवार यांनी रोष व्यक्त केला होता. या निर्णयामुळेच काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रमध्ये दयनीय अवस्था झाली असल्याची टीका पार्थ पवारांनी केली होती. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या ऑफिशयल अकाऊंटवरुन पार्थ पवारांवर निशाणा साधला.

हे देखील वाचा : राष्ट्रवादीत जय पवारांची मोठी एन्ट्री! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची मास्टरस्ट्रोक रणनीती

एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काँग्रेस महाराष्ट्राने प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये लिहिले आहे की, “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील,” अशी घणाघाती टीका पार्थ पवारांवर करण्यात आली.

धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत… — Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 6, 2026

हे देखील वाचा : “…म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था; बारामती पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवारांनी साधला निशाणा

पुढे लिहिले की, “तसेच या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?” असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Web Title: Congress social media post target parth pawar over baramati by election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Baramati by-election
  • Congress Maharashtra
  • parth pawar

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट
2

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण
3

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

NCP Politics:  सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती
4

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.