मणिशंकर अय्यर यांचा फोटो हजारदा फाडेन, शायना एनसी. यांचा ठाकरेंवर पलटवार
या सर्व प्रकारावर आता शायना एन.सी यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रीया दिली आहे. “याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे?” असं म्हणत शायना एनसी यांनी पलटवार केला आहे.
Maharashtra Government: पगारापासून ओव्हरटाइमपर्यंत सर्वकाही बदलणार! महाराष्ट्र सरकारचे नवे
तसेच, ‘मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील. हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा! बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का?की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.
एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन! स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना!” असंही शायना एनसी यांनी म्हटलं आहे.
Happy International Men’s Day: कुटुंबातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा पुरुषदिनानिमित्त ‘या’ खास
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!
काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे?
मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील.
हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा!
बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का?
की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?
एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना! @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @ANANDDUBEYK @sanjaynirupam @sheetalmhatre1 @shahsusieben @GhadiSanjana @TV9Marathi @abpmajhatv @NDTVMarathi @saamTVnews @ibn_lokmat @jaimaharashtran — Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 18, 2026
Ans: सोनिया गांधी यांच्या कथित आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या चर्चांवरून वाद सुरू झाला आहे.
Ans: शायना एन. सी. यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपण मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचे स्पष्ट केले असून, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आपला निषेध कायम राहील, असे म्हटले आहे.
Ans: सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवण्याचे आव्हान देत, बाळासाहेबांप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.






