
DCM Ajit pawar with sharad pawar birthday dinner party at delhi political news
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली. तसेच राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचा एक गट तर अजित पवारांचा एक गट पडला आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये जोरदार राजकीय वादंग झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवल्या असून प्रचारामध्ये एकमेकांवर जहरी टीका केली. यानंतर मात्र पवार कुटुंबामध्ये मनोमीलन झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय वाद बाजूला ठेवून काका-पुतणे हे एकत्र आल्याचे दिसून आले. शरद पवारांच्या घरी झालेल्या या पार्टीमध्ये अजित पवार सहभागी झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीत उभी फुट पडली असली तरी कुटुंबात कोणतेही मनभेद झालेले नसल्याचा सूचक संदेश यामधून गेला आहे.
हे देखील वाचा : प्रकाश महाजन करणार भाजप प्रवेश? म्हणाले, “मी राज ठाकरेंना घाबरत नाही अन्…
काका पुतण्यामध्ये 20 मिनिटे चर्चा
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या स्नेहभोजनामध्ये अजित पवार हे देखील सहभागी झाले. अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यामध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. बंददाराआड झालेल्या या चर्चेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या भेटीमुळे आणि चर्चेमध्ये पवार काका-पुतण्यामध्ये मनोमीलन झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास संघटनेला फायदा होईल, ताकद वाढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे की दादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावे. आजच्या बैठकीत याविषयी चर्चा होईल, असे ते म्हणाले.
हे देखील वाचा : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं
काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबामध्ये लग्नसराई झाली. युगेंद्र पवार यांच्या कुटुंबामध्ये पवार कुटुंब एकत्र दिसून आले. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थिती चर्चेत आली होती. मात्र राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि जय पवार, पार्थ पवार सहभागी झाले होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी परदेशामध्ये अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचे देखील लग्न झाले. यामध्ये शरद पवार उपस्थित राहिले नव्हते. यामुळे दोन्ही नेत्यांची भेट आणि बातचीत झाली असल्याचे सांगितले जात आहे.