मनसे नेते राज ठाकरे हे ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर झाले आहे (फोटो -सोशल मीडिया)
यावेळी ठाणे सत्र न्यायालयाच्या बाहेर मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे हे स्वतः हजर राहणार असल्यामुळे न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी मनसे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे कोर्टाच्या बाहेर उभे राहिले होते. 2008 पासून हे प्रकरण सुरु असून यापूर्वी कल्याण न्यायालयामध्ये याची सुनावणी पार पडली. यानंतर आता ठाणे न्यायालयामध्ये सुनावणी झाली असून यावेळी राज ठाकरे स्वतः उपस्थित आहेत.
हे देखील वाचा : महानगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? बावनकुळेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…
खटल्याच्या सुनावणीसाठी आज गुरुवारी (11 डिसेंबर) राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे हेदेखील आहेत. राज ठाकरे यांची एप्रिल २०२२ मध्ये ठाण्यात उत्तर सभा घेतली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना ही तलवार भेट दिली होती. या सुनावणीवेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी मला गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्टपणे कोर्टाला सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. तर कोर्टाने देखील हे प्रकरण एका महिन्यामध्ये संपेल सहकार्य करा अशी भूमिका घेतली आहे.
हे देखील वाचा : एकनाथ खडसेंच्या अडचणींत होणार वाढ? भोसरी जमीन खरेदीप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
नेमकं प्रकरण काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्हाचे हे प्रकरण आहे. २००८ मध्ये उत्तर भारतीयांसाठी रेल्वे भरती मंडळाची परीक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मराठी तरुणांच्या नोकरीच्या हक्कासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. याच आंदोलनादरम्यान कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मारहाण आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह अनेक मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला हा खटला कल्याण कोर्टात सुरू होता. पण आता तो ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आला आहे. याच जुन्या प्रकरणावर आज सुनावणी झाली.






