Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदेंचा तातडीने मुंबईला येण्याचा कॉल; तानाजी सावंत लगबगीने दाखल, बंद दाराआड 2 तास चर्चा

Tanaji Sawant Eknath Shinde Meet : शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईला बोलावले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 24, 2025 | 11:22 AM
dcm eknath shinde all mla tanaji sawant to meet immediately at mumbai political news

dcm eknath shinde all mla tanaji sawant to meet immediately at mumbai political news

Follow Us
Close
Follow Us:

Tanaji Sawant Eknath Shinde Meet : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील अनेक नेते हे चर्चेमध्ये आले आहेत. काही नेते त्यांनी केलेल्या वकत्व्यांमुळे चर्चेत आहे तर काही नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची देखील नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर तानाजी सावंत यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेटायला बोलावले.

काही दिवसांपूर्वी राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. याकडे देखील तानाजी सावंत यांनी पाठ फिरवली होती. ते पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा असल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सामील झाले नव्हते असे बोलले जात होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करुन तानाजी सावंत यांना फोन करुन मुंबईमध्ये बोलावून घेतले. आमदार तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भेटीचे फोटो देखील शेअर केले आहे. तानाजी सावंत यांनी लिहिले आहे की, “शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज मुंबई येथे तातडीने भेटीचा निरोप आला. या निरोपानिमित्त तात्काळ मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतली. साहेबांसोबत तब्बल 2 तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे. या भेटीमुळे तानाजी सावंत यांची नाराजी दूर झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सुप्रिया सुळे यांचे मटण खाण्याच्या विधानावरुन वाद

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत यापूर्वी देखील नॉन व्हेज खाण्यावर वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावर वक्तव्य केले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावर वक्तव्य केले आहे.

Web Title: Dcm eknath shinde all mla tanaji sawant to meet immediately at mumbai political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • political news
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
1

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर
2

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर

MHADA lottery: म्हाडा कोकण मंडळाची सोडत संपन्न; एकनाथ शिंदे म्हणाले, ” ज्यांना घराची लॉटरी लागली…”
3

MHADA lottery: म्हाडा कोकण मंडळाची सोडत संपन्न; एकनाथ शिंदे म्हणाले, ” ज्यांना घराची लॉटरी लागली…”

Majhi Ladki Bahin Yojna: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर हप्ता जमा होण्यास सुरुवात
4

Majhi Ladki Bahin Yojna: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर हप्ता जमा होण्यास सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.