Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला

Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने 500 कोटी रुपये दिल्याच्या दाव्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत पैसे घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याची भाषा केली.

  • By विवेक
Updated On: Oct 24, 2026 | 02:35 PM
Dr Shrikant Shinde

Dr Shrikant Shinde

Follow Us
Follow Us:
  • 500 कोटींच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
  • एकनाथ शिंदे आणि भाजपच्या कथित व्यवहारावर सवाल
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
 

Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचे चित्र दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांना मॅनेज करण्यासाठी भाजपकडून श्रीकांत शिंदेंमार्फत 500 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात येत आहे. यावरून राज्याच्या राजकारणात चर्चाना उधाण आले असून भाजप आणि शिवसेना शिंदेगटात चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.

शिंदेगट आणि भाजप नेत्यांनी यावरून एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात केली असून आता हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. अश्यातच आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल तीन दिवसांनंतर श्रीकांत शिंदेंनी याप्रकरणावर भाष्य केलं असून यावर मिश्किल टिपण्णी केली आहे.

नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना या कथित पैशांच्या व्यवहारावर उपरोधिक भाष्य केलं. “मनोज जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही पडलाय. 500 कोटी रुपये कुणाकडे गेले, पण माझ्यापर्यंत कसे पोहोचले नाहीत?” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

“एवढी मोठी रक्कम एकत्र ठेवण्यासाठी किती गाड्या लागतील, यावरही आपली चर्चा सुरू आहे. पैसे नेमके कुणी घेतले, याचा शोध घेतला पाहिजे. तुम्हाला काही कळलं तर मला सांगा, मला कळलं तर मी सांगतो,” असं म्हणत त्यांनी मिश्किल अंदाजात टोला लगावला.

मनोज जरांगे यांनी नेमका काय दावा केला?

मनोज जरांगे यांनी काही लोकांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये भाजपकडून 500 कोटी रुपये दिल्याचा आणि जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी पैसे वापरल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, हे पैसे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आणि त्यांनी ते श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवले. या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर द्यावं, असं आवाहनही जरांगे यांनी केलं. भाजप नेमका कुणाचा राजकीय गेम करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चौकशीचे आदेश, सत्य समोर येणार?

या प्रकरणाची शिंदे गटाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली.

आता या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता काय, त्यातील संभाषणाचा संदर्भ नेमका कोणता आणि 500 कोटींच्या दाव्यात तथ्य आहे का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या धुरळ्यात प्रत्यक्ष चौकशीतून काय निष्पन्न होतं, हेच महत्त्वाचं ठरणार आहे.

Manoj Jarange Audio Clip Row : ‘500 कोटी म्हणजे पारावरच्या गप्पा!’ छगन भुजबळांचा जरांगेच्या ऑडिओ क्लिपवर टोला

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे यांनी 500 कोटी रुपयांबाबत काय दावा केला?

    Ans: मनोज जरांगे यांनी एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत भाजपकडून 500 कोटी रुपये दिल्याचा आणि त्यांचा वापर जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी झाल्याचा दावा केला.

  • Que: श्रीकांत शिंदे यांनी 500 कोटींच्या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: श्रीकांत शिंदे यांनी ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत’ असं मिश्किलपणे म्हटलं. पैसे नेमके कुणी घेतले, याचा शोध घेतला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

  • Que: 500 कोटींच्या कथित प्रकरणात चौकशीचे आदेश कोणी दिले?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीचा अंतिम निष्कर्ष काय आहे, हे अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: Manoj jarange audio clip row shrikant shinde reaction vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले
1

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

Manoj Jarange Audio Clip Controversy : जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी पैशांचा खेळ? संजय राऊतांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
2

Manoj Jarange Audio Clip Controversy : जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी पैशांचा खेळ? संजय राऊतांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार
3

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप
4

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.