Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; कोयना जलाशयावरील पुलांची केली पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी साताऱ्यातील दरे येथे मुक्कामासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी कोयना धरणावर बांधण्यात येणाऱ्या तीन पुलांची पाहणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 11:12 AM
DCM Eknath Shinde inspected three bridges under construction on Koyna Dam Satara News

DCM Eknath Shinde inspected three bridges under construction on Koyna Dam Satara News

Follow Us
Close
Follow Us:
  • एकनाथ शिंदे मूळ गावी दरे येथे मुक्काम दौऱ्यावर
  • एकनाथ शिंदेंनी केली साताऱ्यातील कामांची पाहणी
  • कोयना जलाशयावरील पुलांचा घेतला आढावा
 

Satara News : मेढा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब, ता. महाबळेश्वर येथे राहण्यासाठी आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुक्कामी दौऱ्यादरम्यान देखील आराम न करता स्थानिक समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील समस्या जाणून घेतल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी कोयना धरण (Koyna Dam) परिसराची पाहणी केली असून जनतेच्या हिताच्या कामांचा आढावा घेतला आहे.

 

कोयना धरण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर तीन पुल उभारण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्याने उभारण्यात येत असलेल्या तीन महत्त्वाच्या पुलांची पाहणी केली. या पाहणीमध्ये बामणोलीजवळील सावरीसोनाडी, आहीरतापोळा आणि तापोळा आपटी या तीन पुलांचा समावेश होता. हे पूल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे महत्त्वाचे दुवे ठरणार आहेत.यापैकी आहीर ते तापोळा हा पूल पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येत्या दोन महिन्यांत वाहतुकीसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे महाबळेश्वरहून तापोळा मार्गे थेट कोकणात जाणे सोपे होणार आहे.

हे देखील वाचा : आमदारांच्या डॉक्टर मुलीने वडिलांना जीवनदान दिले! DCM शिंदे म्हणाले, “अशी मुलगी केवळ नशिबानेच मिळते…”

सावरी सोनाडी हा पूल डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या पुलामुळे पुणे ते सातारा मार्गे कोकणाशी थेट संपर्क अधिक सक्षम होणार आहे. या तीन पुलांमुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी होईल. तसेच या भागातच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. पुलांमुळे या भागातील पर्यटनात मोठी वाढ होणार असून रस्ते विकासालाही गती मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटन वाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे. नवीन महाबळेश्वर या प्रकल्पामुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : “जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Web Title: Dcm eknath shinde inspected three bridges under construction on koyna dam satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Koyna Dam
  • Satara News

संबंधित बातम्या

शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी
1

शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?
2

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला, संघटना मजबूत करणार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
3

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला, संघटना मजबूत करणार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन
4

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.