Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

Maharashtra Politics : अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना आणि चर्चांना उधाण आले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन नाराजी व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 01:16 PM
MLA Rohit Pawar social media post on Ajit Pawar death politics in maharashtra

MLA Rohit Pawar social media post on Ajit Pawar death politics in maharashtra

Follow Us
Follow Us:
  • आमदार रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट
  • अजित पवारांनंतर सुरु असलेल्या राजकारणावर नाराजी
  • चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? – रोहित पवार
मुंबई : दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती दुःखद निधन झाले. मागील आठवड्यामध्ये मुंबईहून बारामतीला येताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मित जाण्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? अशा अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. यावरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. मात्र त्या परिस्थितीमध्ये आणि सुतकामध्ये अगदी तातडीने शपथविधी सोहळा झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यावरुन देखील राजकारण सुरु झाले. जेष्ठ नेते शरद पवार यांनी 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असा अजित पवारांनी निर्णय घेतल्याचे सांगितले, यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. यावरुन वाद सुरु असताना रोहित पवारांनी चालू राजकारणावर रोष व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर

आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सध्याच्या राजकारणाच्या स्तरावरुन टीका केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!” अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…! — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 4, 2026

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे; येत्या 9 फेब्रुवारीला…

यापूर्वी देखील रोहित पवारांनी अजित पवारांबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…!” असे देखील आमदार रोहित पवार यांनी लिहिले होते.

Web Title: Mla rohit pawar social media post on ajit pawar death politics in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • ajit pawar
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
3

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.