Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : फडणवीसांच्या ‘चीन फंडिंग’ आरोपांवरून महाराष्ट्रात रणकंदन! संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर चीनकडून फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला. यावर संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर देत लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील चीनच्या हालचालींवरून भाजपला सुनावलं.

  • By विवेक
Updated On: Nov 02, 2026 | 04:43 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधी आणि काँग्रेसवर फडणवीसांचा गंभीर आरोप
  • फडणवीसांच्या चीन फंडिंगच्या आरोपावर संजय राऊतांचा पलटवार
  • इंडिया आघाडीच्या रॅलीवरून भाजपला राऊतांचं प्रत्युत्तर
 

Sanjay Raut : देशातील आणि विशेषतः राज्यातील राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर आल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे विरोधकांनी वोटाचोरीचा मुद्दा उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रान पेटवले आहे. सत्ताधारी मात्र विरोधकांवर जोरदार निशाणा साधत देशात अराजकता पसरवण्याचे गंभीर आरोप करत आहेत. अश्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी INDIA आघाडी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत चीनकडून फंडिंग मिळत असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत चीनच्या फंडिंगच्या गोष्टी नंतर करा, आधी देशाच्या सीमेकडे लक्ष द्या, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं. गेल्या काही दिवसांपासून भारत – चीन सीमेवर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे चर्चा रंगू लागल्या आहेत.

फडणवीसांच्या आरोपांना राऊतांचं प्रत्युत्तर

ठाण्यातील सभेत फडणवीसांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर चीनच्या फंडिंगवरून निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, चीनच्या फंडिंगचं नंतर बघू, आधी अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये चीनच्या हालचालींकडे लक्ष द्या. चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी भाजपला चांगलंच सुनावलं. नेपाळमध्येही चीनचा प्रभाव वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. देशाच्या सीमांबाबत बोलण्याऐवजी फंडिंगच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात असल्याची टीका त्यांनी केली.

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!

भाजपने शिवसेना फोडली नसती तर…

इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील रॅलीत महाराष्ट्रातील नेत्यांना भाषणाची संधी मिळाली नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. यावरही राऊतांनी उत्तर दिलं. रॅलीमध्ये सकाळपासून गर्दी वाढत होती. भाषणं लांबत होती आणि गर्दीचा रेटा स्टेजपर्यंत पोहोचत होता. त्यामुळे राहुल गांधींना आपलं भाषण लवकर संपवावं लागलं, असं राऊत म्हणाले. याचवेळी भाजपला टोला लगावत ते म्हणाले, भाजपने महाराष्ट्राची एवढीच चिंता केली असती तर शिवसेना फोडली नसती.

मोदींच्या विरोधात लाट, राऊतांचा दावा

भाजपच्या प्रतिरॅलीवरही संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीका केली. मोदींच्या विरोधात लाट उसळली असून भाजपला देशात नेमकं काय सुरू आहे, याची जाणीव नसल्याचं ते म्हणाले. यावेळी राऊतांनी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरही गंभीर राजकीय टीका केली. त्यांच्यावर खटले चालतील आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल, असा दावाही त्यांनी केला.

एकूणच चीन फंडिंगच्या आरोपावरून सुरू झालेला हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar News: दिल्लीतील आंदोलनापेक्षा राज्यातील दुष्काळ निवारण आमचे प्राधान्य! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर काय आरोप केला?

    Ans: ठाण्यातील लोकशाही बचाव रॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना चीनकडून फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला.

  • Que: संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपांना काय उत्तर दिलं?

    Ans: चीनच्या फंडिंगचा मुद्दा बाजूला ठेवून आधी लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील चीनच्या हालचालींकडे लक्ष द्या, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

  • Que: संजय राऊत यांनी भाजपवर शिवसेनेबाबत काय टीका केली?

    Ans: भाजपने महाराष्ट्राची एवढीच चिंता केली असती तर शिवसेना फोडली नसती, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.

Web Title: Devendra fadnavis china funding allegations sanjay raut reply vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Rahul Gandhi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात
1

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?
2

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन, 20 विरोधी पक्ष एकत्र, राहुल गांधी काय म्हणाले?

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?
3

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?

Harshvardhan Sapkal : फडणवीसांचा राहुल गांधींवर चीन फंडिंगचा आरोप, ‘चीनकडून मोदींना फंडिंग झालं होतं का?’ सपकाळांचा उलट सवाल
4

Harshvardhan Sapkal : फडणवीसांचा राहुल गांधींवर चीन फंडिंगचा आरोप, ‘चीनकडून मोदींना फंडिंग झालं होतं का?’ सपकाळांचा उलट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.