Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रामरक्षा वाचता येत नाही आणि आंदोलन करता’; रामरक्षा आंदोलनावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दिल्लीतील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. रामरक्षा आंदोलनावरूनही त्यांनी उपरोधिक टिप्पणी करत राजकीय वातावरण तापवले.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 08:23 PM
'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

Follow Us
Follow Us:
  • रामरक्षा आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
  • सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उबाठाने दिलेल्या पाठिंब्यावरून महायुतीचा हल्लाबोल.
  • एकनाथ शिंदेंचा आरोप; सरकारविरोधी प्रत्येक आंदोलनाला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा 
 

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत रामरक्षा आंदोलनावरूनही निशाणा साधला.

‘रामरक्षा आंदोलन करण्यापूर्वी दोन पान तरी वाचा’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. रामाच्या नावाने आंदोलन करणं योग्य नाही. मागच्या वेळी त्यांना रामरक्षा म्हणता आली नव्हती. त्यांची तयारी असेल तर मीही त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसती, तरी किमान वाचता तरी आली पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षा वाचताच येत नाही, मग हे कसले आंदोलन?”

याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत, “ते सध्या हताश आणि फ्रस्ट्रेड व्यक्ती झाले आहेत,” असेही म्हटले.

राहुल गांधींच्या TET पेपरफुटीवरील टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; ‘आधी आपल्या पक्षाकडे बघा’

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरून वाद

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

एकनाथ शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे गटावर टीका करत म्हटले, “हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांचा नेहमीच बाहेरून आणि घरातून पाठिंबा असतो. ‘तुम लढो, हम कपडा संभालते है’ अशी त्यांची भूमिका असते. बुडाला जळत असताना डोंगरावर आग विझवायला धावणाऱ्या माणसासारखी उबाठाची अवस्था झाली आहे.”

‘तुम लढो, हम कपडा संभालते है,’ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

शिंदे यांनी पुढे आरोप केला की, सरकारविरोधात जेव्हा जेव्हा आंदोलन उभे राहते, तेव्हा उद्धव ठाकरे गट त्याला पाठिंबा देतो. श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशातील आंदोलनांची उदाहरणे देत उबाठा गट मुद्दाम असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

Web Title: Devendra fadnavis criticises uddhav thackeray over ramraksha and sonam wangchuk protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
1

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
2

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
3

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.