Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, दिल्लीत का पाठवताय?’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देऊन दिल्लीत पाठवले जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी महाराष्ट्रातच राहून सेवा करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Aug 18, 2026 | 09:07 PM
Amruta Devendra fadnavis

Amruta Devendra fadnavis

Follow Us
Follow Us:
  • फडणवीसांच्या दिल्लीवारीच्या चर्चांना अमृता फडणवीसांचा विरोधाभासी सूर
  • ‘फडणवीसांनी महाराष्ट्रातच सेवा करावी’, अमृता फडणवीसांची भूमिका
  • दिल्लीवारीच्या चर्चांदरम्यान फडणवीसांनीही महाराष्ट्रात राहणार असल्याचे स्पष्ट केले
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार आणि त्यानंतर ते दिल्लीत जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांवर स्वतः फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भूमिका मांडली आहे.

नागपूर येथे आयोजित ‘मंथन फॉर यूथ हॅकथॉन’ कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. यावेळी माध्यमांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी फडणवीसांनी महाराष्ट्रातच राहून काम करावे, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली.

‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या’

“महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. फडणवीसांना इथे सेवा करू द्या. त्यांना दिल्लीत का पाठवताय? देवेंद्र फडणवीस जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी महाराष्ट्रातच राहिले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तरुणांना नव्या कल्पनांसाठी प्रोत्साहन

‘मंथन फॉर यूथ’ कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी तरुणांच्या क्षमतेवर भर दिला. तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, उत्पादन क्षेत्र आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांच्या कल्पनांना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. “तुमच्या आयडिया बाहेर येऊ द्या, बदल घडवा आणि ग्लोबल व्हा,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरून विरोधकांकडून सातत्याने राजकीय दावे केले जात आहेत. मात्र फडणवीस आणि आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळे ते महाराष्ट्रातच राहणार असल्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील संभाव्य जबाबदारीच्या चर्चांना सध्या तरी फडणवीसांनी स्वतःच पूर्णविराम दिल्याचे चित्र आहे.

Web Title: Devendra fadnavis delhi move amruta fadnavis reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Beed News : बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं; सकाळी बजरंग सोनवणेंचे गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला
1

Beed News : बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं; सकाळी बजरंग सोनवणेंचे गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला

Shivbhojan Yojana : शिवभोजन थाळीबाबत सरकारचा मोठा निर्णय! नवी नियमावली जारी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड
2

Shivbhojan Yojana : शिवभोजन थाळीबाबत सरकारचा मोठा निर्णय! नवी नियमावली जारी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
3

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
4

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.