Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईतील आंदोलन, SIRची मतदार यादी आणि शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

  • By विवेक
Updated On: Oct 01, 2026 | 06:26 PM
Abhijeet Dipke on Fadnavis and Amit Shah

Abhijeet Dipke on Fadnavis and Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची दिपकेंची घोषणा.
  • SIRची 2025 ची यादी फ्रिज करण्याची मागणी.
  • मुंबईतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून दिपकेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
 

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्यापासून (शुक्रवार, 2 ऑकटोबर) आंदोलन सुरू करण्यात येणार असून, हे आंदोलन देशभर नेण्याची घोषणा दिपकेंनी केली. त्यानंतर जंतर-मंतरवर ठिय्या देण्यात येईल आणि ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला. ‘दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनावेळी गृहमंत्री अमित शहांनी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका’ असे म्हणत त्यांनी फडणवीसांना इशारा दिला.

“2025 ची SIR मतदार यादी फ्रिज करा”

SIRच्या प्रक्रियेवरूनही अभिजीत दिपकेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. 2025 ची SIR मतदार यादी फ्रिज करावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना दिपकेंनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र, हे दावे आणि आरोप संबंधितांकडून किंवा अधिकृत तपासातून सिद्ध झालेले आहेत, असे समजणे योग्य ठरणार नाही. CJPने यापूर्वीही SIR आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

“अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,” फडणवीसांना दिला इशारा

दरम्यान, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनावरून दिपकेंनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ‘ज्याप्रकारे अमित शाह यांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका. आम्हाला अटक करायची असेल तर आता करा,’ असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिलं.

शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरूनही दिपकेंनी सवाल उपस्थित केला. ‘देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कवर रॅली करू शकतात, मग आम्ही तिथे आंदोलन का करू शकत नाही?’ असा सवाल त्यांनी केला. सत्ताधारी नेत्यांना प्रचारासाठी जागा मिळते, मग विरोधातील आंदोलनाला परवानगी का दिली जात नाही, असा त्यांचा मुद्दा होता.

लोकशाही मार्गाने आंदोलन, 4 ऑकटोबरच्या आंदोलनालाही पाठिंबा

परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन करणार असल्याचंही दिपकेंनी स्पष्ट केलं. ‘लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत,’ असं सांगत त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. CJPने यापूर्वीही विविध मुद्द्यांवर आंदोलनं केली आहेत.

दरम्यान, 4 ऑक्टोबरच्या आंदोलनालाही CJPचा पाठिंबा असेल, अशी घोषणा दिपकेंनी केली. आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतः देशभर दौऱ्यावर असल्याने ते मुंबईत उपस्थित नसले तरी CJPचे कार्यकर्ते 4 ऑक्टोबरला मुंबईत सहभागी होतील, असं दिपकेंनी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Web Title: Abhijeet dipke cjp protest gyanesh kumar resignation devendra fadnavis vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • Amit Shah
  • CJP
  • CJP Protest
  • CM Devendra Fadnavis
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
4

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.