Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं; सकाळी बजरंग सोनवणेंचे गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला

Beed News : बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणावरुन बजरंग सोनवणेंनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करत ऑडिओ क्लिप ऐकवली. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 01, 2026 | 09:54 PM
fadnavis with dhananjay munde

fadnavis with dhananjay munde

Follow Us
Follow Us:
  • बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवली.
  • विलास घुले प्रकरणातील ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी.
  • धनंजय मुंडेंची फडणवीसांशी भेट; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हप्ते एकत्र देण्याची मागणी
 

Beed News : बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले. आपल्या मुलाला या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा दावा सोनवणेंनी केला.

अश्यातच आता धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र, उपलब्ध वृत्तांनुसार मुंडे यांनी या भेटीत दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा मांडला.

शेतकऱ्यांसाठी दोन हप्ते एकत्र देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे आणि त्यानंतरची मदत मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. तोपर्यंत केंद्राच्या पीएम किसान आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनांचे किमान दोन हप्ते एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा, जलसंधारणाची कामं आणि शेतकरी-शेतमजुरांना मदत याबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत विविध तातडीच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठवाडा दौरा

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 ऑक्टोबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दुष्काळामुळे शेतीपिकांचं नुकसान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चारा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यावर या दौऱ्यात भर राहणार आहे.

बीडच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोप

विलास घुले हत्या प्रकरणातील आरोप, बजरंग सोनवणेंनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप आणि धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची भेट यामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. आता सोनवणेंनी केलेल्या आरोपांची आणि त्यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची अधिकृत तपासणी काय निष्कर्ष देते, याकडे लक्ष लागलं आहे.

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Web Title: Beed news bajrang sonawane dhananjay munde fadnavis vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • Beed News
  • CM Devendra Fadnavis
  • dhananjay munde

संबंधित बातम्या

Shivbhojan Yojana : शिवभोजन थाळीबाबत सरकारचा मोठा निर्णय! नवी नियमावली जारी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड
1

Shivbhojan Yojana : शिवभोजन थाळीबाबत सरकारचा मोठा निर्णय! नवी नियमावली जारी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
3

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
4

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.