Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’

पत्रकार परिषद ही संबंधित मंत्री किंवा प्रमुख व्यक्तीची असते. अशावेळी इतरांनी बाजूला बसून उपस्थित राहणे योग्य असले, तरी संवादाची जबाबदारी मुख्य व्यक्तीकडेच असावी. हा संकेत सर्वांनी पाळला पाहिजे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 08:11 AM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, 'आमदारांची लुडबूड...'

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, 'आमदारांची लुडबूड...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत आमदार धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मर्यादा पाळण्याचा संदेश दिला. पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत संबंधित जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहू शकतात. मात्र, स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांनी बोलणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सुनील तटकरे म्हणाले की, पत्रकार परिषद ही संबंधित मंत्री किंवा प्रमुख व्यक्तीची असते. अशावेळी इतरांनी बाजूला बसून उपस्थित राहणे योग्य असले, तरी संवादाची जबाबदारी मुख्य व्यक्तीकडेच असावी. हा संकेत सर्वांनी पाळला पाहिजे. पक्षाचे सहकारी यापुढे अशा प्रसंगी आवश्यक त्या मर्यादा पाळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव सांगत, चंद्रशेखर बावनकुळे माझ्या जिल्ह्यात आले होते. त्यावेळी मी पत्रकार परिषदेत उपस्थित होतो, मात्र बोललो नाही. कारण ती पत्रकार परिषद त्यांची होती, असे नमूद केले.

सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या पोस्टचा निषेध

सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या पोस्टचा मी तीव्र निषेध करतो. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पक्षभेद बाजूला ठेवून राज्यभर त्यांची प्रथम जयंती झाली. त्यानंतर वहिनी ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहून काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी अशा प्रकारच्या टीका-टिप्पण्या करत आहे. परंतु काँग्रेसने यात वैचारिक दिवाळखोरी दाखवली. केवळ दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. सार्वजनिक जीवनात काय बोलायचे याचे भान असावे लागते. दुर्दैवाने काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाला ते राहिलेले दिसत नसल्याची टीकाही तटकरे यांनी केली.

बीडबाबत माहिती घेईन, सुनेत्रांवर पक्षात विश्वास

बीडमधील घटनेची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असले, तरी माझी धनंजय मुंडे यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे नेमके काय घडले, याची माहिती घेईन. तसेच सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून, कोणत्याही विषयावर त्या माध्यमांसमोर प्रभावीपणे भूमिका मांडू शकतात, असा विश्वास पक्षातील सर्व सहकाऱ्यांना असल्याचे तटकरे म्हणाले.

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी

Web Title: Dhananjay munde also spoke at dcm sunetra pawars press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • Maharashtra Politics
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
1

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
2

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.