Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhirendra Shastri Controversy : धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याने पेटला वाद

Dhirendra Shastri on Chhatrapati Shivaji Maharaj : बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 11:42 AM
Dhirendra Shastri controversial statement Chhatrapati Shivaji Maharaj controversy in Maharashtra politics

Dhirendra Shastri controversial statement Chhatrapati Shivaji Maharaj controversy in Maharashtra politics

Follow Us
Close
Follow Us:
  • बागेश्वर बाबा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संवादावर भाष्य
  • राजकीय वर्तुळातून जोरदार टीका-टिप्पणी
Dhirendra Shastri Controversy : नागपूर : आधात्मिक गुरु असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. यापूर्वी देखील त्यांनी संत तुकाराम महाराजांबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर धाम (Bageshwar Dham) पीठाधीश्वर बागेश्वर बाबा यांनी केले होते. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) उल्लेख करत त्यांनी टीका केली. यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागपूरमधील जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पीटल परिसरामध्ये भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बागेश्वर बाबा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या समोर धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले.

यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिले की, बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे. मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे. त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पक्षातील जबाबदाऱ्यांची विभागणी, पार्थ यांच्याकडे मुंबई-दिल्ली तर…

याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी संताप दावा केला. ते म्हणाले की, . महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं हे जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर शिवरायांचा अपमान झाला हो, असे म्हणत भाजप रस्त्यावर उतरली असती. छत्रपती शिवरायांना तुम्ही थकलेला माणूस म्हणतात, तुम्हाला कुठून हे सुचतंय, असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय नैतिकतेचा ऱ्हास; जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादांना प्राधान्य

काय केले वादग्रस्त विधान?

धीरेंद्र शास्त्री म्हणाले एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज थकले होते आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवत आपण थकलो असून आता राज्यकारभार सांभाळावा, अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी ती मान्य केल्याचे सांगितले.त्यांनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरु’ असे सांगत पुन्हा मुकुट शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.

Web Title: Dhirendra shastri controversial statement chhatrapati shivaji maharaj controversy in maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Bageshwar Dham
  • chattrapati shivaji maharaj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.