Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब्दुल सत्तार यांच्या अडचणींत होणार वाढ; फौजदारी याचिका झाली दाखल, कारण काय तर…

काही दिवसांपूर्वी महेश शंकरपेल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रात 16 चुका असल्याचे सांगताना त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 01, 2024 | 09:17 AM
abdul-sattar

abdul-sattar

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी ही तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी शनिवारी कोर्टात सुनावणी झाली. ऐन मंत्रिमंडळ निवडीच्या वेळी सत्तारांविरोधात याचिका दाखल झाल्याने सत्तार अडचणीत आले आहेत.

हेदेखील वाचा : मुख्यमंत्री ठरत नसतानाच आता उपमुख्यमंत्रिपदासाठी समोर आली ‘ही’ नावं; महायुतीत खातेवाटपावरून पेच कायम

सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शपथपत्रासंदर्भात दोन याचिका दाखल झाल्या हेित. दोन्ही प्रकरणे त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघात अब्दुल सत्तार २४२० मतांनी निवडून आले आहेत. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली व पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता. परंतु या आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सत्तार यांनी शपथपत्रात खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी

माहिती दिली आहे. हा लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ अ नुसार गुन्हा आहे. तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक यांनी या प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे.

काय आहे आक्षेप ?

काही दिवसांपूर्वी महेश शंकरपेल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रात 16 चुका असल्याचे सांगताना त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यात सत्तारांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे.

शेअर्सबाबतही देण्यात आली खोटी माहिती?

तसेच मालमत्तेवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती देखील दाखवण्यात आली नसल्याचे या आरोपात म्हटले आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तारांनी 2019 च्या निवडणुकीतही चुकीची माहिती दिल्याचा आरोप महेश शंकरपेल्ली यांनी केला होता. त्यावेळीही चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती.

हेदेखील वाचा : अखेर ठरलं ! राज्यातील महायुती सरकारचा 5 डिसेंबरला होणार शपथविधी; पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित

Web Title: Difficulties of abdul sattar may increases know what exactly happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 09:17 AM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
2

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
3

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.