ई-महाभूमीच्या माध्यमातून शासन झाले 'मालामाल'; अभिलेखातून 76.80 कोटींचा महसूल प्राप्त (File Photo : Mantralay)
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊन निकालही लागला आहे. या निकालाला आता एक आठवडा पूर्ण होत आहे. तरीही राज्यात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात असले तरी अद्याप भाजपकडून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असताना आता येत्या पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : सरकार स्थापनेच्या हालचाली मंदावल्या; शिवसेनेला हवी ‘ही’ महत्त्वाची खाती पण भाजप…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स हॅन्डलवर पोस्ट करत ही माहिती दिली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
तसेच दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून, दुपारी एक वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे, अजित पवार होणार उपमुख्यमंत्री?
राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार विराजमान होणार आहेत. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असणार आहे. शिंदे यांनी गृहखातेही मागितले असताना याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. गृहखात्याबाबत नवीन मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
हेदेखील वाचा : ७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर