Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरेंविरोधात 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मातोश्रीबाहेर नोटीस स्वीकारल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी SIT चौकशीचा दाखला देत ‘तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या’ असं म्हणत पलटवार केला.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 07:22 PM
सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार

सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार

Follow Us
Follow Us:
  • सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर; आदित्य ठाकरेंविरोधातील नोटीस स्वीकारण्यात आली.
  • वरुण सरदेसाईंनी आदित्य ठाकरे दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांना ओळखत नसल्याचं म्हटलं.
  • SITच्या तपासाचा दाखला देत ‘पुरावे असतील तर द्या’ असं वरुण सरदेसाई म्हणाले.
 

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी शनिवारी वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर जात आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस दिली. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारल्यानंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले वरून सरदेसाई ?

वरुण सरदेसाई हे नात्याने आदित्य ठाकरेंचे भाऊ आहेत. त्यांनी सांगितलं की, गेल्या पाच-सहा वर्षांपासून आपण सातत्याने सांगत आलो आहोत की आदित्य ठाकरे हे ना सुशांत सिंह राजपूत यांना ओळखत होते, ना दिशा सालियान यांना. या प्रकरणातून वारंवार वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने केला आणि त्यानंतर क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा दाखलाही सरदेसाईंनी दिला. या प्रकरणात अनेक आरोप झाले, मात्र आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नसल्याचा दावा त्यांनी केला.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

दिशा सालियन प्रकरणाबाबत बोलताना सरदेसाईंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तपासाचा उल्लेख केला. त्यानंतर 2022 मध्ये राज्यात सरकार बदललं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

“2023 पासून SITने प्रकरणाचा तपास केला”

सरदेसाईंच्या म्हणण्यानुसार, 2023 पासून या SITने प्रकरणाचा तपास केला. ज्यांनी या प्रकरणात आरोप केले, त्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करण्यास सांगण्यात आलं. पुढे 14 जून 2026 रोजी SITने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रतिज्ञापत्राचा दाखला देताना सरदेसाई म्हणाले की, पहिल्या सरकारने केलेली चौकशी योग्य असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. तपासात तफावत आढळली नसल्याचाही दावा त्यांनी केला.

‘तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या’

दरम्यान, सतीश सालियान यांनी आपलं म्हणणं किंवा स्टेटमेंट योग्य पद्धतीने नोंदवण्यात आलं नसल्याचं म्हटल्यास त्यावरही सरदेसाईंनी प्रतिक्रिया दिली. ‘तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या,’ असं चौकशीदरम्यान सांगण्यात आलं होतं आणि सतीश सालियान यांचं स्टेटमेंट अनेकदा नोंदवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

आता या प्रकरणात सतीश सालियान यांनी दाखल केलेली कायदेशीर नोटीस आणि त्यावर ठाकरे गटाकडून आलेली प्रतिक्रिया यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आलं आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेत या दाव्यांबाबत नेमकी काय भूमिका समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Web Title: Disha salian case varun sardesai satish salian aaditya thackeray matoshree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
1

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
3

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
4

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.