Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावरून मातोश्रीबाहेर शनिवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सतीश सालियान वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर पोहोचले. यावेळी आदित्य ठाकरेंना 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 06:17 PM
‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; सतीश सालियान वकिलांसह दाखल

‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; सतीश सालियान वकिलांसह दाखल

Follow Us
Follow Us:
  • सतीश सालियान वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर नोटीस देण्यासाठी पोहोचले.
  • मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली.
  • आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी 500 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस स्वीकारली.
 

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. शनिवारी दुपारी ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर ही कायदेशीर नोटीस देण्यात आली.

सतीश सालियन यांनी यापूर्वीच आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याच संदर्भातील नोटीस देण्यासाठी ते वकिलांसोबत मातोश्रीवर पोहोचले होते.

‘मला फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरं कोणीही नाही’ – सतीश सालियान

मातोश्रीवर येण्यापूर्वी सतीश सालियन यांनी माध्यमांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. ‘मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरं कोणीही नाही,’ असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. त्यांच्यासोबत वकिलांची पूर्ण टीम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

दरम्यान, सतीश सालियन मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळताच परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईही मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरेंच्या बाजूने नोटीस स्वीकारण्यासाठी अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव हे मातोश्रीच्या गेटवर उपस्थित होते.

मातोश्रीबाहेर तणावाचं वातावरण

मातोश्रीबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. शिवसैनिकांनी सतीश सालियन यांना आत प्रवेश देण्यास विरोध केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नोटीस प्रत्यक्ष घरात देण्याऐवजी गेटवरच स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली.

या प्रकरणात आदित्य ठाकरेंना तब्बल 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली असून त्याची पावती सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आली.

दिशा सालियन प्रकरणात याआधीही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आहे. आता कायदेशीर नोटीस आणि 500 कोटींच्या दाव्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. पुढे या नोटीसवर आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

Web Title: Disha salian case satish salian aaditya thackeray 500 crore defamation notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian
  • Disha Salian case
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
1

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
2

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन
3

Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन

Pradeep Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंची ७ तास चौकशी, राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी पूर्णेकर कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
4

Pradeep Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंची ७ तास चौकशी, राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी पूर्णेकर कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.