Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी ‘या’ मुद्यावरून आमनेसामने

आता हा वाद मिटेल असे मला वाटत नाही. मीही त्यांच्याबद्दल तिखट बोलू शकतो, पण खोलात पडायचे नाही. तसेच, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणी कोणाला मदत केली, हे बाहेर आले तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2026 | 08:15 AM
महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी 'या' मुद्यावरून आमनेसामने

महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी 'या' मुद्यावरून आमनेसामने

Follow Us
Follow Us:

मुंबई : कोकणातील महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता मंत्री योगेश कदम यांनी उडी घेत ‘आता नो कॉम्प्रोमाईज’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.

सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर तडजोडीची कोणतीही शक्यता उरलेली नसल्याचे सांगत योगेश कदम म्हणाले, आता हा वाद मिटेल असे मला वाटत नाही. मीही त्यांच्याबद्दल तिखट बोलू शकतो, पण खोलात पडायचे नाही. तसेच, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणी कोणाला मदत केली, हे बाहेर आले तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. यापूर्वी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करत तटकरे जिथे जेवतील तिथेच छेद करतील, असे वक्तव्य केले होते.

‘धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री केलं तर मराठे अंगावर येतील’; मनोज जरांगेंचा इशारा, पंकजा मुंडेंवरही निशाणा

त्याला प्रत्युत्तर देताना तटकरेंनीही कदम यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांची मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करणारी टिप्पणी केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळला. योगेश कदम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा संघर्ष आता केवळ वैयक्तिक न राहता महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे.

विरोधात शड्डू ठोकणाऱ्यांना भाजपमध्ये घेऊ नये

यापूर्वी महायुतीच्या विरोधात लढले, त्यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार केला पाहिजे, अशा शब्दांत महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेच्या संदर्भाने पाटील यांनी या कानपिचक्या दिल्या आहेत. एवढेच नाही तर आमच्याकडेही पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रिपद

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या ६ खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने संसदेत शिवसेनाच खरी मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

सरकार बदलत नाही; उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांच्या सरकार बदलण्याच्या विधानावर पाटील म्हणाले, केवळ आंदोलन किंवा घोषणाबाजीमुळे सरकार बदलत नाही. जनतेचा विकास करणारे सरकारच टिकते. सध्या राज्य आणि देशात विकासाची कामे सुरू आहेत. दरम्यान, राजीनामा मागताना कोणाचा राजीनामा मागत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. राजीनामा देणे किंवा घेणे हा सरकारचा निर्णय असतो, अशा शब्दांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या मागणीवर प्रत्युत्तर दिले.

Web Title: Dispute between mahayuti on various issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti Politics
  • sunil tatkare
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
3

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.