Eknath Khadse alleges that Girish Mahajan affair with a female IAS officer
मुक्ताईनगर : राज्यामध्ये अनेक नेत्यांमध्ये वादंग असल्याचे स्पष्ट आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये राजकीय वाद असल्याचे सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. एका महिला आयएस अधिकाऱ्याचे नाव घेत खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला लोक जोड्याने मारतील, अशी गंभीर टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते असलेले गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले. एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आले. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसंच आपल्याला त्या महिला अधिकाऱ्याचे नाव देखील माहिती असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. यावरुन आता खडसे विरुद्ध महाजन असा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, “गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र ते नाव सांगणं योग्य ठरणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शाहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते.अमित शाह यांनी गिरीश महाजन यांना सांगितले की, तुझे एका महिला आयएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की, नाही माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असते. पण, शाहांनी त्यांना सांगितले की, तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर-शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यांसह झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आहे”, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया देत खडसेंवर हल्लाबोल केला. महाजन म्हणाले की, “मी जर एक गोष्ट सांगितली तर एकनाथ खडसे घराबाहेर पडल्यावर लोक त्यांना जोड्याने मारतील. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी कधीही कुणालाही तोंड दाखवणार नाही. तसंच जे काही आहे ते लोकांना दाखव फालतू बडबड करु नको. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टींचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळं करुनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही,” असा एकेरी उल्लेख करुन गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.