
Eknath Shinde aggressive on Prithviraj Chavan controversial statement on Operation Sindoor
Prithviraj Chavan on Operation Sindoor : मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवरुन चर्चा आणि राजकारण सुरु झाले आहे. कॉंग्रेस जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत धक्कादायक विधान करत भारतीय सैन्याचा अपमान होईल असे वक्तव्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारला होता असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांचा खरपूस समाचार घेतला.
एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर टीका करत एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानातील जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवतील. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करी जवानांनी उत्तर दिले. तरीही काँग्रेसकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. काँग्रेसचे हे देशप्रेम नाही तर पाकिस्तान प्रेम उतू चालले आहे. ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे यांचे नेते खऱ्या अर्थाने गद्दार आणि देशद्रोही आहेत, असा पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानाचा निषेध एकनाथ शिंदे यांनी केला.
हे देखील वाचा : मुंबईमध्ये अजित पवारांचा भाजपला दे धक्का? नाराजीनंतरही नबाव मलिकांकडे दिले नेतृत्व
राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे. अशा प्रकारच्या विधानांचा जाहीर निषेध करतो. लष्कराला सेल्यूट करतो. पंतप्रधान मोदी यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी सांगितले की, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. याला म्हणतात, देशभक्ती कॉंग्रेसने अशा प्रकारची विधाने केली. त्यांची कबर जनता खोदल्याशिवाय राहणारे नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हे देखील वाचा : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला
ऑपरेशन सिंदूरवर टीका करत पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हणाले की, “अलीकडेच, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे सरकले नाही. दोन-तीन दिवसांत जे काही घडले ते हवाई युद्ध आणि क्षेपणास्त्र युद्ध होते. भविष्यातही अशाच पद्धतीने युद्धे लढली जातील. अशा परिस्थितीत, आपल्याला खरोखरच १२ लाख सैनिकांची सेना असण्याची गरज आहे का, की आपण त्यांना दुसरे काही काम करायला लावू शकतो?”असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. “ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आमचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आपण गमावली. लोकांनी हे मान्य करो अथवा न करो, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर ठेवण्यात आले होते आणि एकही विमान उडाले नाही, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.