Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन

Eknath Shinde: पालघरमधील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या कथित गैरवर्तन आणि मारहाणीच्या घटनेची शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांना पक्षातून निलंबित करून त्यांची हकालपट्टी करण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 05:44 PM
पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांची पक्षातून हकालपट्टी होणार

पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांची पक्षातून हकालपट्टी होणार

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन
  • मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
  • डॉक्टरांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात पक्षाकडून गंभीर दखल
पणजी : पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीच्या घटनेची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांना पक्षातून निलंबित करून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

‘पालघरची घटना अतिशय दुर्दैवी’

पालघरमधील घटनेबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले. डॉक्टर किंवा रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णाच्या उपचारांबाबत काही गैरप्रकार किंवा तक्रार असल्यास त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. संबंधितांनी पोलिसांकडे किंवा सक्षम यंत्रणेकडे तक्रार करणे अपेक्षित होते. मात्र, स्वतः कायदा हातात घेऊन डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांना मारहाण करणे योग्य नाही, असे शिंदे म्हणाले.

Maharashtra Civic Body Financial Rights: नगराध्यक्षांचे वित्तीय अधिकार रद्द; नगरविकास विभागाचा मोठा निर्णय

राहुल घरत यांच्यावर पक्षाची कारवाई

या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “मारहाण करणारे शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांचे निलंबन करण्यात येईल. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल,” असे शिंदे यांनी सांगितले. या भूमिकेतून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कायदा हातात घेण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. संबंधित व्यक्ती पक्षाच्या कोणत्याही पदावर असली तरी अशा घटनांना शिवसेना पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

‘कायदा हातात घेण्याचे शिवसेना समर्थन करणार नाही’

डॉक्टरांवर झालेल्या कथित मारहाणीचे समर्थन केले जाणार नसल्याचे सांगताना शिंदे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही इशारा दिला. कोणतीही समस्या किंवा वाद असेल तर तो कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गाने सोडवला पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

गोवा निवडणुकीवरही भाष्य

यावेळी एकनाथ शिंदे यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्रात तसेच केंद्रात शिवसेना आणि भाजप युतीत असल्याचे सांगत दोन्ही पक्ष एका विचारधारेने जोडलेले मित्रपक्ष असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना आपली भूमिका निश्चित करेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी गोवा निवडणुकीत शिवसेनेची रणनीती काय असेल, याबाबतचा निर्णय निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर घेतला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

खोटी कागदपत्रे दिल्यास कारवाईचा इशारा

निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना खोटी कागदपत्रे सादर करणे किंवा महत्त्वाची माहिती लपवून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. पालघरमधील घटनेवर थेट पक्षांतर्गत कारवाईची घोषणा केल्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. डॉक्टरांवरील कथित मारहाणीबाबत कठोर भूमिका घेत शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही कायद्याच्या चौकटीत राहण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Web Title: Eknath shinde announces action against shiv sena palghar city chief rahul gharat over doctor assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • palghar

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!
1

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
2

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण
3

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
4

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.