Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

मुंबईतील संघटना मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नव्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. सचिन आहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक झाल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 08:55 PM
Eknath Shinde Sachin ahir

Eknath Shinde Sachin ahir

Follow Us
Follow Us:
  • सचिन आहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना नगरसेवकांची बैठक
  • मुंबईच्या संघटनेची जबाबदारी आहिरांकडे देण्याची चर्चा
  • १५ ऑगस्टनंतर विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याची तयारी
 

मुंबईच्या राजकारणात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नव्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्षसंघटनेत बदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन आहिर यांचे पक्षातील वाढते सक्रिय योगदान लक्षवेधी ठरत आहे.

शिवसेना नगरसेवकांची एक बैठक सचिन आहिर यांच्या उपस्थितीत पार पडली. विधिमंडळातील कार्यालयात झालेल्या या बैठकीत नगरसेवकांच्या प्रभागातील प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे, सचिव संजय मोरे, उपमहापौर संजय घाडी, गटनेते अमेय घोले यांच्यासह पक्षाचे नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.

सचिन आहिर हे काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपसभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता मुंबईतील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना अधिक मोठी जबाबदारी दिली जाणार का, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

यापूर्वी मुंबईतील संघटनात्मक जबाबदारी राहुल शेवाळे यांच्याकडे होती. मात्र, महापालिका निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर शिंदेसेनेकडून मुंबईसाठी नव्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे. आहिर यांच्या बैठकीतील सक्रिय सहभागामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

दरम्यान, या बैठकीला राजकीय स्वरूप नसल्याचे गटनेते अमेय घोले यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांच्या विकासकामांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. १५ ऑगस्टनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय शिवसेनेच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

उपमहापौर संजय घाडी यांनीही नगरसेवकांच्या प्रभागातील समस्या समजून घेण्यासाठी सचिन आहिर यांनी चर्चा केल्याचे सांगितले. त्यामुळे ही बैठक नियमित स्वरूपाची असल्याचे पक्षाकडून सांगितले जात असले, तरी मुंबईतील संघटनात्मक समीकरणांमध्ये बदल होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात मुंबईतील पक्ष संघटनेला अधिक सक्रिय करण्यासाठी एकनाथ शिंदे कोणती पावले उचलतात आणि सचिन आहिर यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Eknath shinde mumbai shivsena sachin ahir new strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai News
  • Sachin Ahir
  • shivsena

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.