Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

भाजप शिंदे यांच्या शिवसेनेत विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे, पुणे जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबतही पेच निर्माण झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 09:37 AM
भाजप ठाम, एकनाथ शिंदे नाराज

भाजप ठाम, एकनाथ शिंदे नाराज

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप स्वतः १२ जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

भाजपच्या या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते आपल्या पक्षासाठी किमान ५ जागांची मागणी करत आहेत, परंतु भाजप यासाठी तयार नाही. या सगळ्या वादामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची राजकीय वर्तुळात बरीच कोंडी होताना दिसत आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ३ जागांवर दावा केला आहे. भाजपने शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला २ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, हा फॉर्म्युला स्वीकारण्यास विशेषतः शिवसेना अजिबात तयार नाही. असे असले तरी, आपसातील चर्चेतून या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक, संभाजीनगरवरून पेच

भाजप शिंदे यांच्या शिवसेनेत विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे, पुणे जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबतही पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये १७ जागांसाठी इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, ज्यामुळे आघाडीमध्ये एकमत घडवून आणताना नेत्यांची मोठी दमछाक होत आहे.

फडणवीस-शिंदे यांच्यात चर्चा

फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी विधान परिषदेच्या १७ जागांच्या वाटपावर एकमत करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिंदे आपल्या ५ जागांच्या मागणीवरून मागे हटण्यास तयार नाहीत, अशी माहिती सध्या दिली जात आहे.

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम

राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे बिगूल वाजले असून, राज्यात एकूण १७ जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकसून तयारी करत असल्याचे दिसत येत असून, महायुतीत भाजपला १७ जागांपैकी १२ जागा मिळणार असल्याचे समजत आहे. याबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत.

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी

Web Title: Eknath shinde not agree in seat sharing ratio of legislative council election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Latest Political News
  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.