Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विमानप्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "विमानापेक्षा इमान महत्त्वाचं" म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 06:20 PM
'विमानापेक्षा इमान महत्त्वाचं'; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला

'विमानापेक्षा इमान महत्त्वाचं'; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.
  • “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं,” म्हणत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला.
  • ऑपरेशन टायगरनंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये या भेटीची राज्यभर चर्चा.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून प्रवास केल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली होती. या भेटीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’ – एकनाथ शिंदे

या विमानप्रवासाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेने त्यांना एकाच विमानातून प्रवास करण्याचं तिकीट दिलं होतं, पण त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. त्यामुळे आज ते गटांगळ्या खात आहेत. पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देवेंद्रजी खूप हुशार आहेत. 2019 मध्ये कपटी मित्र किती घातक ठरू शकतो, हे त्यांनी पाहिलं आहे.”

उद्धव ठाकरे यांनी “आमची उच्चस्तरीय चर्चा झाली,” असे म्हटल्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं,” असा टोला लगावला.

उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून ‘या’ शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी

विमानप्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण

मुंबईहून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच इंडिगो विमानातून प्रवास केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे अन्य नेतेही उपस्थित होते.

या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “आमची भेट झाली, हीच मोठी बातमी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती. तर उद्धव ठाकरे यांनी “आमची उच्चस्तरीय चर्चा झाली,” असे सांगत राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर वाढले राजकीय तर्क-वितर्क

राज्यात नुकतेच ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित विमानप्रवासाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे सांगत कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: Eknath shinde reaction on uddhav thackeray devendra fadnavis flight remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
4

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.