Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी आता विधानसभेला उभं राहणार नाही…”; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने व्यक्त केली खदखद

महायुतीमधील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. महायुतीमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराज आहेत. तसेच त्यांनी निवृत्तीची वाच्यता केल्यामुळे चर्चांना उधाण आले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 14, 2025 | 01:46 PM
Eknath Shinde Shiv Sena leader Abdul Sattar comments on political retirement

Eknath Shinde Shiv Sena leader Abdul Sattar comments on political retirement

Follow Us
Close
Follow Us:

सिल्लोड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीमधील अनेक नेते नाराज आहेत. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात एकतर्फी निकाल लागल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दारूण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीचे नाराज आहेत. तर मंत्रीमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते नाराज आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या नाराज नेत्याने यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

विधानसभा निवडणूकीमध्ये शिंदे गटाचे अनेक आमदार चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहे. मात्र महायुती या दुसऱ्यांदा तयार झालेल्या सरकारमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक शिंदे गटाच्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. यामध्ये अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा देण्यात आलेली नाही. यावरुन आता अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

माध्यमांशी संवाद साधून शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘मी आमदार-मंत्री असताना १८-१८ तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला, मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली व माझा विजय 2420 मतांनी झाला. लोकांना विकास नकोय, जाती पातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील. मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही,’ अशी घोषणा त्यांनी केली आहे.

सत्तार पुढे म्हणाले की, ‘मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली, लोकांना विकास नकोय, तर जाती पातीवर निवडणुका हव्यात. आगामी सिल्लोडची नगर परिषद मानी शेवटची निवडणूक राहील, मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली, सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा विकास केला, सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, एमआयडिसी आणली. शेतकरी बागायतदार व्हावा, यासाठी पूर्णा नदीवर बेरिजेस बांधण्याच्या कामाला मंजूरी दिली, असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या एका क्लिकवर

पुढे ते म्हणाले की, “आमदार व मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीच कामे न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मतदान मिळते. विरोधक जाती पातीवर निवडणूक लढवतात, हे राजकारण घातक आहे. जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जाती पातीवर निवडणुका होत असेल, तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्यांचे आभार, पण मी आता यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितले की, मी निवडणूक लढणार नाही, तुला लढायची असेल, तर बध नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र,” अशी घोषणा अब्दुल सत्तारांनी केली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Eknath shinde shiv sena leader abdul sattar comments on political retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Shinde group
  • shivsena

संबंधित बातम्या

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
1

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

Shivsena News : शिवसेनेकडून लोकसभा संपर्कप्रमुखांची घोषणा; मुंबई-ठाण्याची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदेंकडे
2

Shivsena News : शिवसेनेकडून लोकसभा संपर्कप्रमुखांची घोषणा; मुंबई-ठाण्याची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदेंकडे

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
3

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

Kalyan : सुप्रिया सोसायटी ते वाणी विद्यालय रस्ता होणार मजबूत, नागरिकांना दिलासा
4

Kalyan : सुप्रिया सोसायटी ते वाणी विद्यालय रस्ता होणार मजबूत, नागरिकांना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.