दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी प्रचारामध्ये सरकारी वाहन वापरल्याने पोलीस कारवाई केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून येत्या 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासह कॉंग्रेस व भाजपचा जोरदार प्रचार सुरु आहे. आम आदमी पक्षाच्या जोरदार प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी मार्लेना प्रचार करत आहेत. मात्र प्रचारासाठी सरकारी गाडीचा वापर करणं मुख्यमंत्री मार्लेना यांना महागात पडलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. प्रचारासाठी सरकारी गाडीचा वापर केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
राजकीय हेतूंसाठी आणि प्रचारासाठी सरकारी वाहनाचा वापर करण्यात आल्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप आप नेत्यांवर करण्यात आला आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकीय हेतूंसाठी सरकारी वाहनाचा वापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ८ जानेवारी रोजी आतिशी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
प्रश्नातील वाहन, नोंदणी क्रमांक DL-AL-AL1469 असलेली सरकारी कार, निवडणूक-संबंधित क्रियाकलापांसाठी वापरण्यात आल्याचे वृत्त आहे, जीएनसीटीडीच्या सामान्य प्रशासन विभाग (GAD) च्या निर्देशांचे उल्लंघन करून, यामध्ये प्रचारासाठी किंवा निवडणुकीशी संबंधित प्रवासासाठी अधिकृत वाहनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी असते.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी प्रचारासाठी वापरलेली गाडी ही सरकारी गाडी म्हणून नोंदणीकृत गाडी आहे. मात्र ही सरकारी कार, निवडणूक संबंधित कामांसाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी कलम BNS 223 (a) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील सीलमपूरमधील प्रचारसभेत अरविंद केजरीवाल यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं. अरविंद केजरीवाल कधी अदानींविरोधात बोलले आहेत का? पण मी स्पष्टपणे बोलतो. आम्ही देशाला एका उद्योगपतीच्या दयेवर चालू देणार नाही. जातीय जनगणनेबद्दल बोलतो तेव्हा मोदी आणि केजरीवाल दोघांकडून एक शब्दही काढला जात नाही. दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांना विचारलं पाहिजे की ते जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत, जर कोणत्याही भारतीयावर हल्ला झाला तर तुम्ही ते लिहून ठेवू शकता, मग तो कोणीही असो, तो कोणत्याही धर्माचा असो – मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्चन किंवा कोणत्याही जातीचा असो – मग तो एक असो.” दलित असो वा मागासलेला, राहुल गांधी त्याचे रक्षण करताना आढळतील, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.