Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Election Commission Controversy : राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केले. त्यावर भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 08:54 PM
Sudhanshu trivedi on rahul gandhi

Sudhanshu trivedi on rahul gandhi

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या आरोपांवर भाजप नेते सुधांशू त्रिवेदींचा पलटवार
  • ‘राहुल गांधींना राजकीय ज्ञान नाही’; त्रिवेदींची बोचरी टीका
  • SIR करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचा भाजपचा दावा
 

Election Commission Controversy : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मतदार यादीवरील विश्वासार्हता कमी झाली असून, निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

‘स्वतःची जागाही जिंकता येत नाही’; सुधांशू त्रिवेदींचा टोला

राहुल गांधींच्या या आरोपांना आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर थेट हल्लाबोल केला.

राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी असल्याची टीका करत, त्यांना स्वतःच्या राजकीय जागेवरही स्वबळावर विजय मिळवता येत नसल्याचा टोला त्रिवेदी यांनी लगावला. राहुल गांधींनी मांडलेल्या सत्ताविरोधी लाटेच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक इतिहासाचा दाखला देत सवाल उपस्थित केले.

Rahul Gandhi : सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

राहुल गांधींच्या दाव्यांवर बोलताना निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचाही मुद्दा त्रिवेदी यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये मतभेद असल्याचा दावा करण्यासाठी राहुल गांधींकडे ठोस पुरावे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, आयोगाने यापूर्वी SIRसह आपल्या निर्णयांमध्ये अंतिम पातळीवर एकमत असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी 2024 च्या लोकसभा आणि काही विधानसभा निवडणुकांबाबतही गंभीर आरोप केले. तसेच देशातील सत्ताविरोधी लाटेचा मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision म्हणजेच SIR प्रक्रियेवरून गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलं आहे. आयोगाच्या अधिकाराबाबतही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मे 2026 मध्ये बिहारमधील SIR प्रक्रियेबाबत निर्णय देताना निवडणूक आयोगाला संविधानातील कलम 324 आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींअंतर्गत मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाचा अधिकार असल्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे राहुल गांधींचे आरोप आणि भाजपचा पलटवार यामुळे निवडणूक आयोग, SIR आणि मतदार यादीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांवर निवडणूक आयोगाची पुढील भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

Web Title: Election commission controversy rahul gandhi bjp sudhanshu trivedi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • election commission of india
  • Rahul Gandhi
  • SIR

संबंधित बातम्या

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
1

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.