
Election Commission has rejected the BJP campaign song for the BMC elections 2026
देशाची अर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपला यंदा मुंबई पालिकेवर त्यांचा महापौर बसलायचा असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंनी देखील युती केली आहे. तसेच प्रचारासाठी खास रणनीती आखल्या जात आहेत. दरम्यान, मुंबईसाठी भाजपने खास प्रचार गीत देखील तयार केले होते. मात्र या प्रचार गीताला ब्रेक मिळाला आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या मुंबईच्या प्रचार गीताला नकार दिला आहे.
हे देखील वाचा : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा
मीडिया रिपोर्टनुसार, भाजपने मुंबईमधील प्रचारासाठी खास प्रचार गीत तयार केले होते. मात्र या गीतामध्ये भगवा हा शब्द वापरण्यात आल्याने निवडणूक आयोगाने नकार दिला. पण निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार, धार्मिक भावना किंवा विशिष्ट रंगांचा राजकीय प्रचारात वापर करण्याबाबत कडक नियमावली आहे. या गीतातील भगवा शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. हा शब्दप्रयोग आचारसंहितेच्या निकषांमध्ये बसत नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. यामुळे हे गीत भाजपला अधिकृत प्रचारासाठी वापरता येणार नाही, असे म्हणत निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंसोबतची युती राज ठाकरेंना महागात? आणखी एका जवळच्या नेत्याने सोडली साथ
निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानेच भाजपला दणका दिला. प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या या प्रचार गीत भव्य दिव्य प्रकारात रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने ब्रेक दिल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी एक आठवडा शिल्लक राहिलेला असताना हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे हे प्रचार गीत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या गीताच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची भाजपची रणनीती होती. मात्र ऐनवेळी आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.