Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

Maharashtra Politics गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये अनेक गुप्त बैठका सुरू आहेत. मंगळवारी रात्री, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होते

  • By anuradha sagar
Updated On: Jul 18, 2026 | 12:01 PM
Maharashtra Politics, Sharad Pawar-Ajit Pawar NCP,

Maharashtra Politics, Sharad Pawar-Ajit Pawar NCP,

Follow Us
Follow Us:

 

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवाार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार गट यांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( NDA) मजबूत करण्यासाठी या दोन गटांना एकत्र आणण्याच्या बाजूने भारतीय जनता पक्ष (BJP) देखील सक्रीय भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आपला मंत्रिमंडळातील वाटा वाढवण्याचाही प्रस्ताव देत आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, हे विलीनीकरण सोपे नाही. याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये ण पक्षांतर्गत पद आणि वर्चस्वावरून संघर्ष सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुनेत्रा पवार, तसेच त्यांचे ज्येष्ठ पुत्र, राज्यसभा खासदार पार्थ पवार, यांचा या विलीनीकरणाला तीव्र विरोध आहे.

सुनेत्रा पवार यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या मते, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पक्षावर पुन्हा नियंत्रण मिळवावे, असे आई-मुलाच्या जोडीला वाटत नाही.” दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि बहुतांश आमदार या विलीनीकरणाच्या बाजूने आहेत.

महाराष्ट्रात बैठकांची मालिका सुरू

विलीनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये अनेक गुप्त बैठका सुरू आहेत. मंगळवारी रात्री, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होते. त्यानंतर, गुरुवारी रात्री, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गुरुवारी संध्याकाळी, पार्थ पवार यांनी इतर नेत्यांशी झालेल्या चर्चेबद्दल विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, फडणवीस यांनी हे नाकारले आणि या विषयावर सुनेत्रा पवार यांच्याशी थेट बोलणार असल्याचे सांगितले.

सुनेत्रा पवार यांच्या अटी काय असतील?

जर दोन्ही गट विलीन झाल्यास सुनेत्रा पवार यांचा गटाकडून काही अटी-शर्ती लागू केल्या जाऊ शकतात, त्यात महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार याच कायम राहतील, अशी अट घातली जाऊ शकते.

या विलीनीकरणामुळे भाजपला काय फायदा होईल?

सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. भाजप नेतृत्व आपले मतभेद बाजूला ठेवून दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण लागू करणे आणि लोकसभा जागांची पुनर्रचना करण्यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याचा सरकारचा मानस आहे. बहुमताअभावी हे विधेयक मागील अधिवेशनात रखडले होते.

केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने दोन्ही गटांना एकत्र आणण्याची योजना आखली आहे. हे साध्य करण्यासाठी, प्रत्येक गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

पडद्यामागे सर्व घडामोडी सुरू असताना, दोन्ही पक्ष जाहीरपणे कोणत्याही विलीनीकरणाला नकार देत आहेत. सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं होतं. “माझे बंधू अजित पवार जिवंत असताना विलीनीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन होता. पण त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजूने तीव्र विरोध झाला. आमच्यासाठी तो मुद्दा तिथेच संपला.” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच, जर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात सर्व राज्यांसाठी समानतेने ५०% जागावाढीची तरतूद असेल, तर त्यांचा पक्ष त्याला पाठिंबा देण्याचा विचार करेल, असही त्यांनी नमुद केलं .

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले, “आजच्या घडीला कोणतीही चर्चा सुरू नाही. पण उद्या जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर मतदान होईल, तेव्हा काय होईल हे आम्हाला माहीत नाही. राजकारण खूप वेगाने बदलते आणि क्षणात समीकरणे बदलू शकतात.”

अजित पवार यांच्या निधनानंतर वातावरण बदलले

२८ जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अजित यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांनी जुन्या आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचा गट तयार करून पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. भाजपचे फडणवीस आणि शिवसेनेचे शिंदे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांसमोर सुनेत्रा आणि पार्थ ही जोडी पक्षाचे प्रभावीपणे नेतृत्व करू शकणार नाही, अशी आमदारांना शंका आहे.

 

Web Title: Maharashtra politics sharad pawar bjp offer cabinet ministers ncp masterplan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • BJP
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
2

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.