Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार

जिल्हा परिषदांचे लोकनियुक्त, स्वीकृत आणि पदसिद्ध सदस्य हे या मतदारसंघाचे मतदार असून, विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यातील ही सर्वांत 'अर्थपूर्ण' आणि महागडी निवडणूक समजली जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2026 | 07:42 AM
स्थानिक संस्था विधान परिषद निवडणुकीचे वेध

स्थानिक संस्था विधान परिषद निवडणुकीचे वेध

Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा, विधानसभा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. या सर्व महत्त्वाच्या निवडणुका झाल्याने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये असलेली प्रशासकीय राजवट संपृष्टात आली आहे. त्यानंतर आता २०२३ पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक होण्याची चिन्ह आहेत. राज्यात सध्या या मतदारसंघाच्या १७ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे संख्याबळ ७८ सदस्यीय असून, स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून २२ सदस्य निवडून दिले. जिल्हा परिषदांचे लोकनियुक्त, स्वीकृत आणि पदसिद्ध सदस्य हे या मतदारसंघाचे मतदार असून, विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यातील ही सर्वांत ‘अर्थपूर्ण’ आणि महागडी निवडणूक समजली जाते. अनेक दिग्गज नेत्यांनी पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, काही पक्षांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या धनिकांनाही याच मतदारसंघाच्या माध्यमातून आमदारकी बहाल केली होती.

दरम्यान, या मतदारसंघाच्या २२ जागांपैकी बहुतांश जागा मागील तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. २०२२-२३ दरम्यान अनेक सदस्यांची मुदत संपली; पण तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ ठप्प झाल्यामुळे विधान परिषदेच्या वरील मतदारसंघाची निवडणूक घेता आली नाही.

विधान परिषदेत 17 जागा रिक्त

महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांच्या १७ जागा रिक्त आहेत. त्यात मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली आणि लातूर-धाराशिव-बीड या चारही जागांचा समावेश आहे. त्याशिवाय अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाचा समावेश आहे.

परिणय फुके, आंबटकर होते आमदार

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात प्रियदर्शन चतुवैदी, वर्धा चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात रामदास आंबटकर, तर भंडारा गोंदियातून परिणय फुके हे आमदार होते.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादीलाही यश

साताऱ्याच्या माण तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या पाच गटापैकी राष्ट्रवादीने तीन तर भाजपाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर  पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपचे पाच पाच उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने बाजी मारली असून, पंचायत समितीची सत्ता मात्र समसमान जागा मिळाल्याने सभापतीच्या निवडी चिट्ठीवर ठरणार आहे.

हेदेखील वाचा : Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

Web Title: Everyone attention is focused on the legislative council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:11 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
4

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.