माण तालुका पंचायत समिती निकाल सातारा जिल्हा परिषद निकाल समोर आला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maan Political News : दहिवडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु झाली. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे (Political News) कल समोर येत आहेत. यामुळे राज्यभरातील ७४३८ उमेदवारांची धाकधूक आणखी वाढली आहे. माण तालुक्याचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी समसमान असल्याचे दिसून आले. (Satara News)
माण तालुक्यातून जिल्हापरिषदेच्या पाच गटापैकी राष्ट्रवादीने तीन तर भाजपाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपचे पाच पाच उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने बाजी मारली असून पंचायत समितीची सत्ता मात्र समसमान जागा मिळाल्याने सभापतीच्या निवडी चिट्ठीवर ठरणार आहे.
जिल्हापरिषदेसाठी राष्ट्रवादीचे गोंदवले गटातून शीतल राहुल रणपिसे, मार्डी गटातून सोनाली मनोज पोळ तर कुकूडवाड गटातून अनिल देसाई हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे आंधळी गटातून सोनल शेखर गोरे व बिदाल गटातून अलका बाळकृष्ण जगदाळे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
हे देखील वाचा : भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष
माण पंचायत समितीच्या दहा जागासाठी राष्ट्रवादीचे पाच व भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे मार्डी गणातून प्रियांका भुजंगराव जगदाळे, वरकुटे म्हसवड गणातून कल्पना विरकर, गोंदवले गणातून गौरी दिलीप तुपे, कुकुडावड गणातून विक्रम शिंगाडे, वरकुटे मलवडी गणातून विद्या तानाजी काटकर तर भाजपचे आंधळी गणातून अर्जुन चांगदेव काळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. मलवडी गणातून बाळकृष्ण कुंडलिक कदम, बिदाल गणातून उषा संजय भोसले, वावरहिरे गणातून राजाराम महादेव बोराटे, पळशी गणातून डॉ. राजेंद्र मधुकर खाडे हे निवडून आले आहेत.
हे देखील वाचा : “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला
सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे
सातारा तालुक्याच्या आठ गट आणि 16 जणांच्या मिनी मंत्रालय राजकारणात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्याच समर्थकांनी बाजी मारत राजे गटाचे वर्चस्व कायम ठेवले .सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .येथून राष्ट्रवादीचे कामेश कांबळे यांनी भाजपचे संदीप शिंदे यांचा पराभव करत भूमिपुत्र शेवटी सरस हा संदेश दिला .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या. हे निकालांचे अपवाद वगळता शिवेंद्रसिंह राजे यांचे तालुक्यातले राजकारण मजबूत असल्याचा परिचय मतदारांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता.






