अजित पवार अनंतात विलीन (फोटो- सोशल मीडिया)
बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातून अजित पवारांना श्रद्धांजली
जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद
रत्नागिरी: पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि महाराष्ट्रात सर्वत्र सन्नाटा पसरला. बातमीवर विश्वास कसा ठेवावा अशी स्थिती निर्माण झाली असतानाच बातमी तर खरी आहे हे समजताच सर्वांनाच धक्का बसला आणि सारेच सुन्न झाले.
१९९१ मध्ये बारामतीतून विधानसभेत निवडून आलेले अजित दादा पवार हे त्यानंतर कधी थांबलेच नाही त्यांचा राजकीय आलेख नेहमीच चढता राहिला आणि पाहता पाहता ते बारामतीचे न राहता अख्या महाराष्ट्राचे केव्हा झाले हे कोणाला समजले नाही. काकांच्या सावलीतून वाहेर येत स्वतःचे स्थान निर्माण करीत ते राज्यात किंगमेकर बनले. जसा त्यांचा राज्याच्या अन्य भागांवर विकासात्मक दृष्टिकोन होता तसाच तो दृष्टिकोन कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या बाबतीत नेहमीच दिसून आला.
Ajit Pawar Funeral : ‘अलविदा दादा…’ अखेर घड्याळाचा काटा थांबला! अजित पवार अनंतात विलीन
चिपळूणसह सावर्डे बाजारपेठ बंद
राज्याचे उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. दादांसह ५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर चिपळूणमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दादांच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले, लाडके दादा आपल्याला सोडून गेल्याचे लक्षात आल्यानंतर चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारपासून बंद पाळून दादांना आदरांजली वाहिली. तसेच रिक्षा व्यवसायिकांनी देखील बंद पाळला. सावडेंत देखील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ विमानाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई ते बारामती असे निघाले होते. बुधवारी सकाळी विमान चारामती मध्ये लौंडिंग होत असतानाच विमानाला अपघात झाला आणि दादांसह ५ जणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण देशासह महाराष्ट्रात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली.
अजित पवार अनंतात विलीन
अखेर घड्याळाचा काटा थांबलाच! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा समुदाय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमून अजित दादांना अलविदा केलं. सर्वांच्या डोळ्यात पाणी बघायला मिळतंय. यावेळी लाडक्या दादांना निरोप देण्याकरिता लाखोंचा जनसमुदाय दाखल झाला आहे. तसेच अजित पवार यांना तोफांची सलामी देण्यात आली.






