Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाला धक्का; रामवाडी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

रामवाडी ग्रामपंचायत ही शिवसेना गटाची झाली असून, सातारा-जावळीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2025 | 01:20 PM
पाचगणीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाला धक्का

पाचगणीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाला धक्का

Follow Us
Close
Follow Us:

पाचगणी : रामवाडी (ता. जावळी) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच इतर चार सदस्यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

रामवाडी तालुका जावळी हे गाव बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते. त्यांच्या विचारांचीच गावात ग्रामपंचायत सत्ता होती. परंतु, गावातील अंतर्गत धुसफूस, मतभेद टोकाला गेल्याने सरपंच श्रीरंग रामचंद्र गलगले यांचेसह ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बाबुराव पोफळे, वासंती दिलीप पाडळे, श्रद्धा किसन पाडळे, अनिता अनिल गलगले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

हेदेखील वाचा : “हे शहाणपण आधी आलं असतं तर ही स्थिती झाली नसती…; विजय वडेट्टीवार यांचा ठाकरे गटाला टोला

यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते या सदस्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद कणसे, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, तालुका प्रमुख सातारा रोहित कटके, तालुका प्रमुख जावली समीर गोळे, शहरप्रमुख मेढा संजय सुर्वे, सोशल मीडिया प्रमुख लालसिंग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामवाडी ग्रामपंचायत ही शिवसेना गटाची झाली असून, सातारा-जावळीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकंदर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून विकासात्मक वाटचाल रामवाडी गावची अलबेलपणे चालू असताना अचानकपणे सरपंच श्रीरंग गलगले यांनी टोकाचे पाऊल उचलत पक्ष बदल का केला याची चर्चा सर्वत्र चालू आहे.

हेदेखील वाचा : Raj Thackeray : लेखी अध्यादेश का नाही…? हा सरकारचा डाव नाही ना? राज ठाकरेंच्या मनात पुन्हा चुकचुकली संशयाची पाल

Web Title: Five members of the gram panchayat including the ramwadi sarpanch join shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
4

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.