Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?

Gokul Chairmen Election 2026 : आज गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने चार सरकारी संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचं अधिकार दिला. यामुळे अध्यक्षपद निवडीचं गणिताचं बदललं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 11:08 AM
Gokul milk Bombay HC satej Patil Hasan Mushrif

Gokul milk Bombay HC satej Patil Hasan Mushrif

Follow Us
Follow Us:
  • आज ठरणार गोकुळचा अध्यक्ष
  • महायुती आणि समविचारी आघाडीत चुरस
  • सरकारनियुक संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्याने मोठा गदारोळ
 

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात आता चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. संचाला मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागांवर बाजी मारली. तर, महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गोकुळचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र राज्य सरकारने चार सरकारी संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचं अधिकार दिला. यामुळे अध्यक्षपद निवडीचं गणिताचं बदललं आहे.

निवडणुकीनंतर सतेज पाटील यांच्या आघाडीकडेच अध्यक्षपद जाणार अश्या चर्चा रंगल्या असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सगळा गेमच फिरवला असल्याचं बोललं जात आहे. सरकारनियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे महायुतीचे पारडं जाड झालं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच काल (रविवार, 9 नोव्हेंबर) कोल्हापुरात सरकारविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला.

आज सकाळी 11 वाजता शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना सव्वा-सव्वा वर्ष अध्यक्षपद देण्याचे नियोजन असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादी, त्यानंतर भाजप आणि शेवटी शिंदेसेनेला संधी मिळू शकते. उर्वरित कालावधीत जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष असेल, अशीही चर्चा आहे.

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

पहिलं अध्यक्षपद स्वीकारायला नेत्यांची टाळाटाळ?

विशेष म्हणजे, अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असतानाच पहिल्यांदा अध्यक्ष होण्यासाठी महायुतीतील नेत्यांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्याची माहिती आहे. सध्या महायुतीविरोधात वातावरण असल्याने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना नेते सावध भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणजीतसिंह पाटील यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ते माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, भाजपकडून अंबरीष घाटगे आणि डॉ. चेतन नरके यांची नावे पुढे येत आहेत. तर शिंदेसेनेकडून अजित नरके यांच्या नावाची चर्चा होती. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने शशिकांत चुयेकर यांना आधीच उमेदवार म्हणून पुढे केले आहे.

29 संचालकांच्या मतदानाकडे लक्ष

या निवडणुकीत 25 निवडून आलेले संचालक आणि चार शासननियुक्त संचालक असे एकूण 29 जण मतदान करणार आहेत. शासननियुक्त संचालकांसाठी स्वतंत्र मतपेटी ठेवण्यात येणार असून संपूर्ण मतदान प्रक्रियेचं छायाचित्रणही केलं जाणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील गोकुळ कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महायुती आणि समविचारी आघाडीच्या समर्थकांसाठी पोलिसांनी स्वतंत्र जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार आणि गोकुळच्या सत्तेची सूत्रं कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे.

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार आहे?

    Ans: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे.

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा फॉर्म्युला काय आहे?

    Ans: भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सव्वा-सव्वा वर्ष अध्यक्षपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यानंतर उर्वरित कालावधीत जनसुराज्य पक्षाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत?

    Ans: राष्ट्रवादीकडून रणजीतसिंह पाटील आणि राजेश पाटील, भाजपकडून अंबरीष घाटगे आणि डॉ. चेतन नरके, तर शिंदेसेनेकडून अजित नरके यांच्या नावांची चर्चा आहे. समविचारी आघाडीकडून शशिकांत चुयेकर यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.

Web Title: Gokul chairmen election 2026 mahayuti president formula vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Gokul
  • Gokul Milk
  • kolhapur news
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा
1

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

Gokul President Election 2026 : गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?
2

Gokul President Election 2026 : गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?

Satej Patil: Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला
3

Satej Patil: Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला

Gokul Milk Association: गोकुळ दूध संघावरून राजू शेट्टी आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांवर केली जोरदार टीका
4

Gokul Milk Association: गोकुळ दूध संघावरून राजू शेट्टी आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांवर केली जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.